गोवा: आंदोलन मागं न घेण्यावर टॅक्सी चालकांची ठाम भूमिका

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

आज सकाळी टॅक्सीचालक नेते बाप्पा कोरगावकर व सुनील नाईक यांना अटक करण्यात आली आहे.

पणजी : गेल्या काही दिवसापासून राज्यात खाजगी टॅक्सी चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. कोरोना (Corona) महामारीचे प्रमाण वाढत असल्याने हे आंदोलन आता त्या त्या भागात टॅक्सी स्टँडवर सुरू करण्यात आले आहे. व जोपर्यंत ॲप अग्रिगेटर व गोवा माईल्स व टॅक्सी सेवा रद्द केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याच्या भूमिकेशी टॅक्सीचालक ठाम आहेत.

राज्यामध्ये 144 कलम लागू असताना हे टॅक्सीचालक (Taxi drivers) एकत्रित येऊन आंदोलन करत असल्याने पर्वरी पोलिसांनी आज सकाळी टॅक्सीचालक नेते बाप्पा कोरगावकर (Bappa Korgonkar)  व सुनील नाईक (Sunil Naik) यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे टॅक्सी चालकानी पर्वरी पोलीस स्थानकावर गर्दी करून त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.  सरकार हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप टॅक्सी चालकाने केला आहे मात्र सरकारची ही दांडेलशाही खपवून घेतली जाणार नाही.

काल म्हापसाच्या आठवडी बाजारात कोरोना दबून मेला; पहा फोटो

सरकारने त्वरित यावर तोडगा न काढल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत किनारपट्टी भागातील भाजप आमदारांना (Bjp MLA) निवडणुकीत योग्य तो धडा शिकवला जाईल असा इशारा टॅक्सी चालकांनी दिला आहे तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी टॅक्सी चालकावर अन्याय न करता यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे. नेरुळ येथे बालाजी टेलीफिल्म्स शूटींगसाठी गोव्या बाहेरून टॅक्सी आणल्याने आंदोलन करत असलेल्या गोव्यातील टॅक्सीचालक संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर व सुनील नाईक यांच्यासह इतर टॅक्सी चालकांनी त्यांना जाब विचारला व धमकी दिली तसेच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

संबंधित बातम्या