Goa Taxi मध्ये दरवाढ, सामान्यांच्या खिशाला कात्री

भाडे दरवाढ मागणी गोवा सरकारने पूर्ण करताना सरासरी तीन रुपये प्रति किलोमीटर अशी दरवाढ केली आहे.
Taxis in Goa
Taxis in GoaDainik Gomantak

पणजी: राज्यातील टॅक्सी (Goa Taxi) चालकांची गेल्या कित्येक वर्षापासून असलेली भाडे दरवाढ मागणी आज गोवा सरकारने (Goa Government) पूर्ण करताना सरासरी तीन रुपये प्रति किलोमीटर अशी दरवाढ केली आहे. या भाडे दरवाढ संदर्भाची अधिसूचना आज वाहतूक खात्याने काढली आहे. ही दरवाढ विविध टॅक्सी वाहन प्रकारानुसार करण्यात आल्याची माहिती आज वाहतूक मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Goa taxi fares have been hiked by Rs 3 per km)

राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासंदर्भात अधिक माहिती देताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की वारंवार टॅक्सी चालकांना मीटर बसविण्याची विनंती करण्यात आली तसेच त्यांना या मीटरच्या शुल्कामध्ये सवलत देऊनही काहीनी हे मीटर बसवण्याकडे दुर्लक्ष केले. टॅक्सी वाहनाचा शेवटचा क्रमांक 0 व 1असलेल्यांसाठीची डिजिटल मीटर बसवण्याची मुदत संपून गेली आहे.

Taxis in Goa
Goa Taxi: डिजिटल मीटर्सच्या शुल्कात 50% सूट

हा शेवटचा क्रमांक असलेल्या राज्यात 3584 टॅक्सी आहेत त्यापैकी 137 जणांनी डिजिटल मीटर लावले आहेत तर 513 जणांनी डिजिटल मीटर बसवण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे 650 जणांनी डिजीटल मीटर बसवण्याचीएकशे अंमलबजावणी पूर्ण केली असली तरी 2934 चालकांनी मीटर बसवले नाहीत त्यामुळे त्यांचा टॅक्सी परवाना रद्द करण्यापासून पर्याय नसल्याचे माहिती मंत्री यांनी दिली.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती आहे त्यामुळे जे कोणी दिलेल्या मुदतीत त्याची अंमलबजावणी करणार नाही त्यांचे टॅक्सी परमिट रद्द करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com