Goa Taxi: स्वखर्चाने डिजिटल मीटर बसवा; नंतर सरकार देणार पैसे

वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी डिजिटल मीटर संदर्भातील अधिसूचना जारी केली
Goa Taxi
Goa Taxi Dainik Gomantak

पणजी : गोव्यातील (Goa) प्रवासी टॅक्सींना डिजिटल मीटर (Digital taxis Meters) बसविण्यासंदर्भात गोवा सरकारने (Goa Government) निश्चित केलेल्या योजनेतील कलम 4 आणि 6 मध्ये बदल करून टॅक्सी मालकांनी स्वत:हून खर्च करून डिजिटल मीटर बसवून घ्यावेत असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर टॅक्सी मालकांना (Taxi Owner) तत्काळ 11234 रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याचे निश्चित केले आहे. बुधवारी वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासंदर्भातील वाद जोरदार गाजत होता. काही टॅक्सी मालकांनी आधी डिजिटल मीटरला विरोध केला होता. पण, सरकारने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यास तयार झाले, मात्र त्या डिजिटल मीटरसोबत प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटन याचा खर्च वाढल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर तोडगा काढत टॅक्सी मालकांनी स्वखर्चाने या सुविधा घ्याव्यात. त्या बदल्यात त्यांना अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.

Goa Taxi
Goa Taxi: राज्यातील 1849 डिजीटल टॅक्सी परवाने रद्द

पण, भाजपच्या काही मंत्री, आमदारांनी टॅक्सी मालकांच्या बाजूने पुढाकार घेत गोवा सरकार त्यांना मोफत डिजिटल मीटर देण्याचे आश्वासन केले होते. निवडणूक तोंडावर असताना टॅक्सी मालकांचा विश्वास जपण्यासाठी सरकारनेही त्यांना डिजिटल मीटरसह सर्वच गोष्टी मोफत देण्याचे जाहीर केले होते.

Goa Taxi
Goa Taxi चालकांची सरकारविरोधात ‘गांधीगिरी’

आणि गेल्या बुधवारी वाहतूक संचालक सातार्डेकर यांनी अधिसूचना जारी करीत, टॅक्सी मालकांनी धक्काच दिला. आधी स्वखर्चाने डिजिटल मीटर, प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटन या सुविधा टॅक्सीमध्ये बसवाव्यात. त्यानंतर त्यांनी अर्ज आणि पुर्ण आवश्यक ती कागदोपत्री प्रक्रीया करून वाहतूक खात्यात जमा करावीत. या सुविधेबदल्यात गोवा सरकारकडून टॅक्सी मालकांच्या बँक खात्यांत तत्काळ 11,234 रुपये जमा केले जातील, असे त्या आदेशात सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ज्यांनी स्वत:हून डिजिटल मीटर बसवून घेतले आहेत. त्यांनाही सरकारकडून आर्थिक मोबदला दिला जाईल, असे वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com