राज्याच्या तापमानात वाढ..!

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला असून  तापमानात वाढ झाली आहे. समुद्रकिनारी ४० ते ५० कि. मी. प्रति तास इतका वाऱ्याचा वेग असल्याने समुद्रात न उतरण्याचा इशारा मासेमाऱ्यांना देण्यात आला आहे.

पणजी:  राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला असून  तापमानात वाढ झाली आहे. समुद्रकिनारी ४० ते ५० कि. मी. प्रति तास इतका वाऱ्याचा वेग असल्याने समुद्रात न उतरण्याचा इशारा मासेमाऱ्यांना देण्यात आला आहे. शिवाय समुद्रानजीक न जाण्यासाठीचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात आज दिवसभरात काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. वातावरणातील थंडावा पाऊस नसल्याने कमी होत असून तापमानात वाढ होत आहे. 

गेल्या चोवीस तासात राज्यात तापमानात वाढ झाली असून काल ३१.१ अंश सेल्सिअस आणि कमीत कमी २३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली 
आहे.

संबंधित बातम्या