Goa : निसर्ग-मानव यांचा समन्वय म्हणजे गोपाळकाला (Gopalkala)

(Brahmeshananda) ब्रह्मेशानंदाचार्य ः तपोभूमी गुरुपीठावर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात (Goa)
Goa : निसर्ग-मानव यांचा समन्वय म्हणजे गोपाळकाला (Gopalkala)
कुंडई : सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींसोबत कृष्ण भक्तीत रममाण ब्रह्मवृंद. Goa, 31August, 2021Gomantak

खांडोळा (प्रतिनिधी) ः निसर्ग व मानव यांचा समन्वय म्हणजे गोपाळकाला होय. हिंदूधर्म, (HINDU) हिंदू संस्कृती, असे केंद्र ज्याठिकाणी सर्वांचा मिलाप आहे. भगवत् सत्ता याठिकाणी अवतरित होऊन संदेश देत आहे, की ईश्वर सर्वत्र विराजमान आहे. गरीब, श्रीमंत, धनिक, अशिक्षित, सुशिक्षित, संस्कारित जरी असेल तरी भगवत् सत्ता तिथे असल्याने अशा सर्वांपलीकडे भगवंताला सर्वजण प्रिय आहेत, असे संबोधन ब्रह्मेशानंदाचार्यांनी तपोभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात केले.

कुंडई : सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींसोबत कृष्ण भक्तीत रममाण ब्रह्मवृंद. Goa, 31August, 2021
Goa: कोरोनामुळे वाद्ये दुरुस्ती व्यवसायात मंदी, कारगिरांकडून खंत

ते पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचा जन्म असा उत्साह घेऊन आला आहे, की विश्वभर संस्कृती, भगवत सत्ता सर्वत्र आहे. भगवान साक्षात अवतरित होत आहेत, ही गोष्ट ऐकायला खूप बरी वाटते. भगवत सत्तेच्या आधारे सर्व मानव समाजावर कृपा, आनंद, अद्वितीय दैवी सुख-संपत्ती, ऐश्वर्य, मनोभुमिका तयार झाली पाहिजे. भगवत् सत्ताच याठिकाणी येऊन सर्वांकडून आपली कृपाप्राप्त करण्यासाठी सेवा स्वरुप या अवतरण कार्यात भगवत् सत्तेलाच साथ देत आहे. गोपाळकाला म्हणजे एकसंघ समाजाचे दर्शन आहे.
३० रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त महापूजा, गोकुळ पूजन तथा श्रीकृष्ण पूजन सुसंपन्न झाले. त्यानंतर टाळ, मृदुंग व श्रीकृष्णांच्या गजरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ३१ रोजी गोपाळकाला उत्सव पूज्य स्वामीजींच्या सान्निध्यात तपोभूमी(TAPOBHUMI)वैदिक गुरुकुल ब्रह्मवृंदांद्वारे साजरा करण्यात आला. यामध्ये सद्‍गुरू पूजन श्रीकृष्ण महापूजा, गोपाळकाला उत्सव वेगवेगळे खेळ, फुगडी, कला सादर करून हा सोहळा मोठ्या आनंदाने श्री क्षेत्र भूमीवर संपन्न झाला. त्यानंतर दहीहंडी, आरती, दर्शन व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com