Goa: बागा-कळंगुटात 'दृष्टी'च्या जीवरक्षकांकडून सहा मच्छीमारांना जीवदान  

मच्छीमारीसाठी समुद्रात निघालेल्या 6 स्थानिक मच्छीमारांची बोट लाटांच्या तडाख्याने उलटली
Goa: बागा-कळंगुटात 'दृष्टी'च्या जीवरक्षकांकडून सहा मच्छीमारांना जीवदान  
Drishti Lifeguard GoaDainik Gomantak

Goa: बागा -कळंगुट (Baga - Calangute) येथील समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या स्थानिक मच्छीमारांची (Local fisherman)  होडी समुद्रातील लाटांच्या तडाख्यात उलटल्याने (Boat capsized) जीवाच्या आकांताने पाण्यात उड्या घेतलेल्या सहा जणांचे द्रुष्टीच्या कर्मचार्यांनी (Drishti Lifeguard Staff) दाखविलेल्या तत्परतेमुळे प्राण वाचले.

Drishti Lifeguard Goa
गोव्यातील तीन तळ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय पाणवठ्याचा दर्जा

दरम्यान, नेहमीप्रमाणे, मच्छीमारीसाठी समुद्रात निघालेल्या स्थानिक मच्छीमारांची बोट समुद्रातून अचानक उठलेल्या प्रचंड लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यापासून शंभर मीटरवर उलटी झाली. यावेळी  प्राण वाचविण्यासाठी  जीवाच्या आकांताने समुद्रात उड्या घेत आकांततांडव करणार्या बोटीवरील कर्मचाऱ्यांना 'द्रुष्टी' या जीवरक्षक संस्थेचे पर्यवेक्षक मंगेश गांवस यांनी जेट स्कायचा आधार घेत समुद्रात गाठले व सहकारी मित्र बाबाजी नाईक, प्रथमेश महाले तसेच किरण पवार यांच्या मदतीने सर्वच्या सर्व सहाही खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. किनाऱ्यावर कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली असता ते सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com