Goa: वास्कोत शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात साजरा

श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या.
Goa: वास्कोत शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात साजरा
श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्याDainik Gomantak

दाबोळी: वास्कोत शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक परंपरेनुसार (annual tradition) हार्बर मुरगाव येथून वास्को सप्ताहाचा शेवटचा पार वास्कोतील श्री दामोदर मंदिरात (Shri Damodar Temple)आणून उत्सवाची सांगता करण्यात आली. वर्ष पद्धतीप्रमाणे वास्कोत शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या.

श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या
Digital Taxi Meter: गोव्यातील टॅक्सी मालकांना पुन्हा धक्का

दरम्यान मुरगाव हार्बर येथील श्री दामोदर राष्ट्रोळी इश्वटी ब्राह्मण देवस्थानात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. वास्कोतील उद्योगपती नारायण राजाराम बांदेकर यांच्या यजमानपद सदर धार्मिक विधी पार पडल्या. त्यांचे पुत्र नितीन नारायण बांदेकर यांनी पुजेचे यजमानपद केले. दुपारी आरती तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. रूढीनुसार श्रावण महिन्यात जर पाच सोमवार आले तर पाचव्या श्रावणी सोमवारचा मान उद्योगपती नारायण बांदेकर यांना जातो. त्यानुसार यंदा पाच श्रावणी सोमवार आल्याने शेवटचा पाचवा सोमवार उद्योगपती नारायण बांदेकर यांच्या यजमानपदाखाली संपन्न झाला.

श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या
श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्याDainik Gomantak

दरम्यान मंदिरात दुपारच्या सत्रात पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ (आखाडा) गोवा यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यात कुमारी प्राजक्ता राजेंद्र फडते, तन्वी औदुंबर फडते, सौ सुमिता तारी, तनुजा फडते, तामशी शेट,ॠतूजा फडते,कु.चेताली पार्सेकर, जितेंद्र नरसिंह फडते (संवादिनी), हर्ष राजेंद्र फडते, राजेंद्र फडते (पखवाज) यांनी भाग घेतला होता. नंतर आरती तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम झाला.दरम्यान विविध धार्मिक विधीनंतर मंदिरात विविध मान्यवरांचा तसेच , भजनी कलाकार यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन उद्योजक नितीन नारायण बांदेकर यांच्या हस्ते त्यांच्या ईश्वरी सेवेबद्दल सत्कार करण्यात . यात पुरोहित सुहास लिमये, बोगदेश्वर महिला भजनी मंडळ, श्री दामोदर राष्ट्रोळी इश्वटी ब्राह्मण महिला भजनी मंडळ, प्रकाश कासकर, महेंद्र गावकर, कालिदास धुरी यांचा समावेश आहे.

श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या
श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्याDainik Gomantak

या सत्कार सोहळ्यानंतर मंदिरात बालगोपाळांचा तसेच महिला तर्फे दिंडीचा कार्यक्रम झाला. नंतर वर्षपद्धतीप्रमाणे येथील मंदिराचे प्रमुख अनिल काणकोणकर यांच्या हस्ते श्रीफळ घेऊन वास्कोतील दामोदर देवस्थानात जायला रवाना झाले. सदर श्रीफळ मिरवणूक म्हणजे वास्को सप्ताहचा शेवटचा पार असून कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षी व यंदा सदर पार मिरवणूक काढण्यात आली नाही. वर्षानुवर्षे पार मिरवणूक दिंडी सहित श्री दामोदर मंदिरात मार्गक्रमण करत होती. पण दोन वर्षे कोरोनामुळे यात खंड पडल्याने सदर मिरवणूक काढण्यात आली नाही.

श्री दामोदर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक विधी पार पडल्या
Goa: राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

दरम्यान श्रीफळ वास्कोतील श्री दामोदर मंदिरात आणल्यानंतर ते दामोदर चरणी अर्पण करण्यात आले. नंतर आरती व तीर्थप्रसादाने संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी दामोदर देवस्थानात पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ, आखाडा व नंतर स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम झाला. शेवटी आरती व तिर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. या दरम्यान शेवटच्या सोमवारचे यजमान उद्योगपती नारायण बांदेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या प्रसंगी पुरोहित सुहास लिमये व नाईक यांचा श्री दामोदर देवस्थानात प्रत्येक गुरुवारी व सोमवार असे दोन दिवस भजनी सेवेबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी श्री दामोदर सप्ताह उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, सचिव संतोष खोर्जूवेकर, पुरोहित भूषण बर्वे व इतर उपस्थित होते. यंदा कोरोना महामारीचे सावट असल्याने नियमावलीनुसार उत्सवाची सांगता लवकर करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com