Goa: माकडमारे आदिवासी जमात नागरीसुविधेपासून अजूनही वंचितच

झावळाच्या भिंती आणि झावळाचेच छत अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या निरंकाल फोंडा येथे राहणाऱ्या 20 कुटुंबासाठी मात्र एक नवीन पर्व सुरु झाले आहे.
Goa: माकडमारे आदिवासी जमात नागरीसुविधेपासून अजूनही वंचितच
Makadmare tribalDainik Gomantak

मडगाव: माकडमारे ही आदिवासी जमात (Makadmare tribal) गोवा (Goa) मुक्तीपासून गोव्यात वास्तवास असली तरी अजूनही नागरी सोयीसुविधा पासून दूरच आहे. झावळाच्या भिंती आणि झावळाचेच छत अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या निरंकाल फोंडा येथे राहणाऱ्या 20 कुटुंबासाठी मात्र एक नवीन पर्व सुरु झाले आहे. त्यांच्या घरात आता रात्रीच्या वेळी चक्क विजेचे दिवे पेटू लागले आहेत.

गोवा ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या कुटुंबांना सोलर बॅटरीवर चालणारे विजेचे दिवे उपलब्द करून दिले असून आता इतरांप्रमाणे त्यांच्याही घरात रात्रीच्यावेळी विजेचे दिवे पेटू लागले आहेत. पूर्वीच्या काळी रानटी जनावरे पकडून त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या जमातीला त्यासाठीच माकडमारे असे नाव पडले होते. गोव्यात विविध ठिकाणी या जमातीची सुमारे 100 कुटुंबे विखुरलेल्या स्थितीत असून निरंकाल येथे त्यांची जास्त वस्ती आहे. ही कुटुंबे अजूनही हलाखीच्या अवस्थेत कसे जीवन जगतात याचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर राज्य मानव हक्क आयोगाने त्याची स्वेच्छा दखल घेत वीज खात्याला तसेच आदिवासी कल्याण खात्याला लक्ष घालण्याचा आदेश दिला होता.

Makadmare tribal
Goa Tourist: गोव्याची दारे खुली न झाल्याने रशियन पर्यटक इजिप्तकडे वळण्याची भीती

मात्र ही कुटुंबे झावळाच्या खोपटात राहत असल्याने विजेचे कनेक्शन देणे त्यांच्यासाठी धोकादायक बनू शकते असे वीज खात्याने कळविले होते तर माकडमारी ही जमात अनुसूचित नसल्याने आदिवासी कल्याण खात्यातून त्यांना काही मदत करता येत नसल्याचे त्या खात्याने कळविले होते. असे जरी असले तरी राज्य ऊर्जा विकास प्राधिकरण शेवटी त्यांच्या मदतीला धावून आले. या कुटुंबांची विजेची सोय झाली असली तरी अजून छपराची सोय झालेली नसून ऊन पावसात ही कुटुंबे झावळाच्याच खोपटात राहत आहेत. त्यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांच्यासाठी काम करणारे सचिन तेंडुलकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com