Goa: डिचोली साप्ताहिक बाजारातील विक्रेत्यांना पालिकेने हाकलले

चतुर्थी बाजारावरही मर्यादा येण्याची शक्यता (Goa)
Picture after Bicholim Municipality expelled the weekly market On 18 August,2021. (Goa)
Picture after Bicholim Municipality expelled the weekly market On 18 August,2021. (Goa)Dainik Gomantak

Bicholim: संचारबंदी (Curfew) आणि पालिकेच्या परवानगीशिवाय बुधवारी साप्ताहिक बाजारात (Weekly market) बसलेल्या भाजीपाला आदी विक्रेत्यांविरुद्ध (Vegetable Seller) पालिकेने कारवाई (Bicholim Municipality in Action) करताना या विक्रेत्यांना अखेर बाजारातून हाकलून लावले. पालिकेच्या या कारवाईमुळे बुधवारी (ता. 18) साप्ताहिक बाजाराचा विक्रेत्यांचा प्रयत्न फसला. पालिकेच्या या कारवाईनंतर बाजारातील गर्दीवरही नियंत्रण आले (Control on Crowd in market area). दरम्यान, पालिकेने सकाळी हटविल्यानंतर दुपारी विक्रेत्यांनी पुन्हा धंदा सुरु केला. मात्र पालिकेने या विक्रेत्यांची भाजी उचलून नेली.

Picture after Bicholim Municipality expelled the weekly market On 18 August,2021. (Goa)
Goa: चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड वॉरीअर्सचा सत्कार

एकाबाजूने 'कोविड' नियंत्रणात येण्यासाठी लागू केलेली संचारबंदी सरकारने अद्याप पूर्णपणे मागे घेतलेली नाही. त्यातच साप्ताहिक बाजारासही सरकारने वा पालिकेने अजून अनुमती दिलेली नाही नसताना देखील विक्रेत्यांकडून गेल्या आठवड्यापासून डिचोलीत साप्ताहिक बाजाराच्या हालचाली सुरु होत्या. मात्र पालिकेच्या आजच्या कारवाईनंतर बाजार सुरु ठेवण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पालिकेच्या या कारवाईचे डिचोलीवासियांनी स्वागत केले आहे. सरकारने परवानगी दिल्याशिवाय साप्ताहिक बाजार सुरु करण्यात येणार नाही. चतुर्थीत भरणाऱ्या माटोळी आदी बाजारावरही मर्यादा घालण्यात येईल. असे डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी चार दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

Picture after Bicholim Municipality expelled the weekly market On 18 August,2021. (Goa)
Goa Crime: तरुणीची मरणानंतर होत असलेली बदनामी पोलिसांनी थांबवावी; आमदार रेजिनाल्ड

साप्ताहीक बाजारात गर्दी

संचारबंदीनंतर तब्बल तीन महिन्यानंतर गेल्या आठवड्यात डिचोलीत नियमितप्रमाणे नसला, तरी काही प्रमाणात साप्ताहिक बाजार भरला होता. त्यामुळे बाजारात वर्दळही दिसून येत होती. गेल्या आठवड्यात परवानगीशिवाय बाजारात बसलेल्या विक्रेत्यांविरोधात कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्याच संधीचा फायदा घेत आज भाजीपाला विक्रेत्यांनी साप्ताहिक बाजाराच्या ठिकाणी आपला मोर्चा वळवला. सकाळी जवळपास 60 टक्के विक्रेत्यांनी साप्ताहिक बाजाराची जागा व्यापून आपला विक्रीचा धंदाही सुरु केला. बाजार भरला, म्हटल्यानंतर बाजारात हळूहळू ग्राहकांची वर्दळही वाढत होती. पालिकेला या प्रकाराची माहिती मिळताच,साधारण अकरा वाजता मार्केट निरीक्षक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी बाजारात धाव घेवून विक्रेत्यांना बाजारातून हाकलले.

Picture after Bicholim Municipality expelled the weekly market On 18 August,2021. (Goa)
Goa: पणजी मनपा व दुकानदार यांच्यातील संघर्ष पेटणार

विक्रेत्यांचे सामान उचलले

बाजारातील विक्रेत्यांना सकाळी पालिकेने हटवल्यानंतर दुपारपर्यंत साप्ताहिक बाजारात शुकशुकाट दिसत होता. दुपारनंतर मात्र बहूतेक विक्रेत्यांनी पुन्हा बाजारात मोर्चा वळवून आपला धंदा पुन्हा सुरु केला. ही माहिती मिळताच कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजारात धाव घेवून विक्रेत्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता, विक्रेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. एक विक्रेता तर मार्केट निरीक्षकांच्या अंगावर धावून गेला. बराचवेळ हा गोंधळ सुरु होता. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने पालिकेने भाजीपाला विक्रेत्यांचे सामानच उचलून नेले.

सरकारने संचारबंदी पूर्णपणे मागे घेतल्याशिवाय साप्ताहिक बाजाराला अनुमती देण्यात येणार नाही. बाजारातील विक्रेत्यांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात येईल. चतुर्थीच्या बाजाराबाबतीत लवकरच उपाययोजना तयार करण्यात येणार आहे.

- कुंदन फळारी, नगराध्यक्ष, डिचोली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com