Satari : ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या घटली

Satari: सत्तरीच्या ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची समस्या वाढत चालली असून गणेश चतुर्थी नंतर ऑनलाईन शिक्षणासाठी वर्गात मुलांची संख्या घटत चालल्याचे दिसून आले आहे.
Satari : ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची  संख्या घटली
ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या घटली Dainik Gomantak

Satari : सत्तरीच्या ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची (online education) समस्या (problem) वाढत चालली असून गणेश चतुर्थी नंतर (Ganesh Chaturthi) ऑनलाईन शिक्षणासाठी वर्गात मुलांची संख्या घटत चालल्याचे दिसून आले आहे. ऑनलाईन शिक्षणासंबंधी सत्तरीतील विविध शाळांचा आढावा घेतला असता, ऑनलाईन वर्गाला विद्यार्थ्यांची हजेरी घटल्याचे आढळून आली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सर्वांकडे पोहचत नसून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर (education of students) होत आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या घटली
Goa Elections: ‘आय पॅक’च्या वतीने गोव्यात तृणमूल काँग्रेसचा झंझावात

गेल्या दोन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हे नुकसान आणखी होऊ नये म्हणून सरकारने शाळा सुरू कराव्या अशी मागणी या भागातून होत आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात 21 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने झाल्यावर सुरुवातीला या वर्गांना मुलांची संख्या चांगली असायची पण शाळेत महिना उलटल्यावर ही संख्या घटत गेली. काही विद्यालयामध्ये आता ही संख्या वर्गाच्या पटसंख्येपेक्षा अर्ध्या पेक्षा कमी झाल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे विद्यालयासमोर ऑनलाईन वर्गांना विद्यार्थी संख्या वाढवण्याचे आवाहन आहे.

मागील वर्षी असाच उतरता होता टेंड

दरम्यान मागील शैक्षणिक वर्षी सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यावेळेस ही सुरुवातीला चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर ऑनलाईन वर्गासाठी प्रतिसाद कमी होत गेला होता. त्यानंतर कोविड19 चा धोका कमी झाल्यावर इयत्ता नववी, दहावी, बारावी यांचे वर्ग सुरू झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिकण्याची संधी मिळाली होती.

ऑनलाईन शिक्षणाचे असेही गैरपरिणाम

ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी बरेच कंटाळलेले दिसून येते. एक म्हणजे जेव्हा ऑनलाईन वर्गांना मुले हजर राहत नाही. जेव्हा त्यांना शिक्षकाकडून विचारले जाते तेव्हा नेटवर्क नाही, मोबाईल बॅटरी कमी होती, मोबाईल नव्हता अशी कारणे सांगतात. वरच्या वर्गातील मुले तर ऑनलाईन वर्गाला जोडून मोबाईल वर खेळ किंवा भलतेच उपक्रम करीत असतात. ज्या मुलांना मोबाईल किंवा नेटवर्क नसल्याने वर्ग जोडता येत नाही तर दुसऱ्या बाजूने ज्या मुलांकडे अशा सोयी सुविधा आहेत ती मुले भलत्यात उपक्रमामध्ये गुंतलेली असतात त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे डोईजड झाले आहे व त्याचा गैरपरिणाम विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणावर होताना दिसत आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या घटली
Goa Taxi: डिजिटल मीटर्स न बसविणाऱ्यांसाठी...

शाळा सुरू करण्याची वाढती मागणी

दरम्यान ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची मोठे शैक्षणिक नुकसान होत असून लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची मागणी सत्तरीच्या ग्रामीण भागातून होत आहे. गोव्यात सर्वत्र सरकारने कोविड 19 ची नियमावली खूपच ढिली केलेली असून कॅसिनोसह व इतर आस्थापने सुरू झाली आहे. सरकारचा निवडणूक प्रचार जोरदार सुरू आहे. पण सरकार शैक्षणिक संस्था मात्र सुरू करीत नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या संबंधी केरी सत्तरी येथील रेश्मा मोरजकर यांनी सांगितले की, आता सर्व आस्थापने सुरू झालेली आहे. लोक कोविड सुरक्षा नियमावली न पाळता सर्वत्र फिरतात. गणेश चतुर्थीत तर सर्वजण खुलेआम फिरले. सर्वसामान्यांच्या मनातून कोविडची भीतीही दिसत नाही. तेव्हा शाळा बंद करून सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू देणे हे योग्य नाही त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com