Goa: भ्रमिष्टांवस्थेतील वृद्ध महिलेस हणजुण पोलिसांनी पोहोचवले मुळ गांवी

शिवोली येथील स्वामी समर्थ मठाच्या परिसरात गेले दोन दिवस अनाथावस्थेत (Goa)
Goa: भ्रमिष्टांवस्थेतील वृद्ध महिलेस हणजुण पोलिसांनी पोहोचवले मुळ गांवी
Anjuna police & a citizen with an old woman at Siolim (Goa)दैनिक गोमन्तक / संतोष गोवेकर

Goa: शिवोली येथील स्वामी समर्थ मठाच्या (Siolim Swami samarth math) परिसरात गेले दोन दिवस अनाथावस्थेत आसरा घेणाऱ्या झरेबांबर - दोडामार्ग (Zarebambar - Dodamarg) येथील 75 वर्षीय विधवा महिलेस हणजुण पोलिस स्थांनकाचे निरीक्षक सुरज गांवस यांनी दाखविलेल्या तत्पर कार्यक्षमतेमुळे तासाभराच्या अवधीत मुळ गांवी पाठविण्यात आले. दरम्यान, स्थानिक स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर तसेच दै. गोमंतकचे प्रतिनिधींंनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली. 

Anjuna police & a citizen  with an old woman at Siolim (Goa)
Goa Assembly Election 2022: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार सत्तेवर

दरम्यान, झरेबांबर-दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) (Sindhudurg - Maharashtra) राज्यातील पचाहत्तर वर्षीय  विधवा दोन दिवसांपूर्वीच उत्तर गोव्यातील म्हापसा बस स्थांनकात एसटी बस वाहतुकीद्वारे म्हापशात उतरल्या होत्या. त्यानंतर त्या दांडा- शिवोलीतील जिवनमुक्त मठात एक रात्र घालविल्यानंतर  कशाबशा स्वामींच्या मठात पायर्यावर झोपलेल्या अवस्थेत मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर यांना सापडल्या. दरम्यान, वेर्णेकर यांनी दै. गोमंतकचे स्थानिक प्रतिनिधी संतोष गोवेकर यांच्याशी संम्पर्क साधत  हणजुण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गांवस यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, उपनिरीक्षक सुजय कोरगांवकर तसेच महिला कॉन्स्टेबल यांच्या मदतीने याबाबतीत  तात्काळ कारवाई करीत खाजगी वाहनाचा उपयोग करीत राधाबाई नाईक यांना त्यांच्या मुळ गांवी पोहोचविण्यात आले.

Related Stories

No stories found.