Goa: सावंत सरकारच्या जनविरोधी शासनावर गोंयचो आवाज पक्षाचा हल्लाबोल

लोकांच्या हिताचा विचार न करता, सरकारने हे राज्य भांडवलदारांना विकले आहे. गोव्याला वाचवण्याची नितांत गरज आहे.
pramod sawant
pramod sawant Dainik Gomantak

लोकांचे कर्ज दिवसेंदिवस वाढत असून ही बाब प्रचंड चिंतेची आहे. यावरून हे स्पष्ट दिसून येते की, भाजप(BJP) सरकार लोकांची पिळवणूक करून त्यांच्याकडील शेवटचा देखील पैसा काढून घेण्याच्या प्रयत्न करतो. मुख्यमंत्री(CM) प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सध्या विनाशाचा साक्षीदार बनलेला असून राज्याची प्रगती खुंटते आहे, याचा गोंयचो आवाज पक्षाने निषेध केला आहे.

गोंयचो आवाज चे (GoenchoAvaaz)राज्य संयोजक व्हिरिएतो फर्नांडिस म्हणाले की, 'प्रत्येक आघाडीवर, मुख्यमंत्री सावंत गोवा येथील लोकांच्या प्रती अपयशी ठरत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था(Economy) डबघाईला आली आहे. यामध्ये बेरोजगारी 20.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर गोव्याचा GDP वाढीचा दर राष्ट्रीय आकड्यापेक्षा खाली उतरत चालला आहे. वेळोवेळी सावंत यांचे सरकार हे सिद्ध करते, की ते लोकविरोधी काम करीत आहे. त्यामुळे गोव्याच्या लोकांना आम्ही विनंती करतो, की पुढील वर्षी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून स्वतःचे 'अच्छे दिन' स्वतः च आणावे. असे सरकार, जे चांगले शासन देण्यासाठी पुरेसे सक्षम असेल.

pramod sawant
गोंयचो आवाज: अटल सेतूच्या चौकशीसाठी ‘GSIDC’ला पाठवले पत्र

सर्व बाजूंनी, गोमंतकीयांना दडपणाचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या निर्लज्ज व गैरव्यवहारामुळे जगण्याची किंमत महाग होत चालली आहे. आणि ते लोकांना प्रखरपणे जाणवू लागले आहे. सर्व समस्यांवर सरकारचा एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकांवरचे ओझे वाढविणे. नागरीक हे इंधन (Fuel)आणि किराणा दरवाढिचा सामना करत असताना , सरकार दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत दुसऱ्यांदा LPG सिलेंडरच्या किंमती वाढवत आहे. यातूनच लोकांच्या आर्थिक बजेटवर (Financial budget)आणखी ताण कसे टाकू शकते? गोव्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या दुःख आणि कष्टांना दुर्लक्ष करणारे हे सरकार बधिर झाले आहे का? असा प्रश्न फर्नांडिस (Fernandes) यांनी विचारला आहे.

गोंयचो आवाज चे उपाध्यक्ष रोशन मथायस(Roshan Matthias) म्हणाले, की गोवा 'नो रिटर्न'च्या टप्प्यावर पोहोचला आहे हे लक्षात घेता, आमचा विश्वास आहे, की गोमंतकीय अधिक चांगल्या प्रशासनास पात्र आहेत. लोक अशा शासनाला पात्र करतील, जे जनहिताचे संरक्षक म्हणून आणि गोव्यासाठी योग्य ते करण्याची तीव्र इच्छा बाळगून कार्य करतील. आम्ही प्रत्येक धोरण आणि निर्णयाच्या मुळाशी लोकांचे हित ठेवून काम करू, हे गोंयचो आवाजचे गोमंतकीयांना वचन आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

pramod sawant
Vaccination: गोवा सरकारने घोषणाबाजी करून स्वतःची शोभा करू नये

गोंयचो आवाज पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर (Swapnesh Sherlekar)म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दुटप्पीपणा दिसून येत आहे. नागरिकांना १६,००० लिटर पाणी मोफत देण्याच्या सरकारच्या घोषणेवरून ते स्पष्ट होते. त्यासाठी पाण्याच्या बिलामध्ये अतिरिक्त १०० रुपये तसेच अन्य शुल्क वाढविण्यात आले आहे. शब्द आणि कृतीतील वर्तनाचे हे विरोधाभास महसूल मंत्री जेनिफर मॉन्सेरात यांच्यात देखील दिसून येते. ज्यांनी आधी भूमिपुत्र अधिकारी विधेयकाबद्दल गंभीर शंका व्यक्त केली होती. आणि त्यानंतर त्यांच्याच खात्याने विधानसभेत विवादास्पद विधेयक सादर केले. त्यावेळी मात्र, मंत्री मॉन्सेरात यांनी शांतपणे विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने मतदान केले. जर प्रमोद सावंत सरकारचे मूल्यमापन करायचे झाले, तर मला खात्री आहे, की त्यांच्या पैकी कोणीही मस्टर पास करू शकणार नाही. याशिवाय, गोव्यातील लोकांना बलात्कार, खून, भीती आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, कारण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या सर्व बाबी सरकारबद्दल हेच सांगतात, की सरकार पूर्णपणे दिशाहीन झाले आहे.

गोवा राज्य एका वेढ्याखाली आहे. लोकांच्या हिताचा विचार न करता, सरकारने हे राज्य भांडवलदारांना विकले आहे. गोव्याला वाचवण्याची नितांत गरज आहे. या सरकारच्या कुशासनामुळे ओढवलेल्या आपत्तींचे निराकरण करण्यासाठी गोंयचो आवाज एक मजबूत पर्याय आहे. ज्या अपघाती सरकारला लोकांचा कौल देखील मिळाला नाही, त्यांच्यासाठी निर्दोष गोमंतकीयांनी का सोसावे? असेही शेर्लेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com