Goa: पावसामुळे केळावडे पुलाचा रस्ता खचला, त्वरित दुरुस्तीची मागणी

साटयेच्या ओहोळावरील (Satye Rivulet ) पुलाचा (Bridge) रस्ता खचला असल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
Goa: पावसामुळे केळावडे पुलाचा रस्ता खचला, त्वरित दुरुस्तीची मागणी
केळावडे रावण कॉलनी येथील खचलेला रस्ताDainik Gomantak

पर्ये: सत्तरीतील रावण कॉलनी- केळावडे ( kelavade, Ravan colony in sattari taluka) येथील साटयेच्या ओहोळावरील (satye rivulet ) पुलाचा (bridge) रस्ता खचला असल्याने मोठ्या पावसात तो आणखी खचून रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

केळावडे रावण कॉलनी येथील खचलेला रस्ता
Goa: साखळीत 17 वर्षीय विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पडत असलेल्या पावसामुळे या पुलावरुन पाणी वाहत होते त्यामुळे हा रस्ता आणखी कमकुवत झाला आणि खचायला सुरुवात झाली. या पुलाची उंची कमी असून तो सिमेंटच्या पाईपचा आहे. त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान घोटेली 2 ते केळावडे मार्गावर हा पूल आहे. जर हा रस्ता खचल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होईल व त्याचा परिणाम या दोन्ही गावातील नागरिका साहित या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना होईल.

केळावडे रावण कॉलनी येथील खचलेला रस्ता
Goa Crime: कारमध्येच साधला डाव आणि अमरच्या डोक्यात घातली गोळी

तसेच केरीतून तळेखोल- दोडामार्ग जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे याचा परिणाम आंतरराज्य वाहतुकीवर पडेल. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होते. या संबंधी वाळपोई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलींगकर यांना विचारले असता हा रस्ता खचल्याची माहिती आम्हाला मिळाली, असून त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती केली जाणार आहे. याच्या दुरूस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com