Goa : अंगणवाडी सेविकांचे कार्य अतुलनीय

Goa :
Goa : अंगणवाडी सेविकांचे कार्य अतुलनीय
Goa : Nursery Teachers in Dharbandora.Dainik Gomantak

धारबांदोडा : कोरोना (Covid 19) महामारीच्या काळात अंगणवाडी सेविकांनी (Nursery Teachers) केलेले काम अतुलनीय व उल्लेखनीय असेच आहे. कठीण परिस्‍थितीत त्‍यांनी बजावलेल्‍या सेवेत एक भावनिक नातं जोडलेले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याचा सरकार योग्य ती दखल घेण्यास असून दरवर्षी उत्कृष्ट मुख्य सेविका, सेविका व हेल्पर असा पुरस्कार स्व. मनोरमा राणे यांच्या नावे दिला जाईल. यासाठी आपण स्वखुशीने पन्नास लाख रुपये अनामत रक्कम म्‍हणून ठेवणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी केली.

Goa : Nursery Teachers in Dharbandora.
Goa Dahi Handi: राज्‍यात दहीहंडीचा कार्यक्रम साधेपणाने साजरा

धारबांदोडा तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महिला व बालकल्याण खात्याचे गट स्थलांतरीत कार्यालयाचे उद्‍घाटन व तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे कोविडयोद्धा म्हणून सन्मानसोहळा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्यासोबत बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर महिला व बालकल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक, उपसंचालक ज्योती देसाई, सिडीपीओ शैला नाईक स्वाती प्रभू व छाया गडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन, दीपाली नाईक यांनी स्वागत, तर शैला नाईक यांनी आभार मानले. सर्व प्रथम स्थलांतरीत कार्यालयाचे फीत कापून उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर सन्मान सोहळा झाला.

...म्‍हणूनच व्‍यथा जाणतोय!
आपली आई ही अंगणवाडी सेविका होती त्यांचे काम आपण जवळून पाहिले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची व्यथा आपण जाणू शकतो. कमी पगार असूनही त्यांनी कोरोनाच्या काळात उत्‍कृष्ट सेवा बजावली आहे, असे बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यावेळी म्हणाले. धारबांदोडा तालुक्यात काही अंगणवाड्या भाडेपट्टीवर चालत आहेत. त्या तशा राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. मंत्री विश्‍वजित राणे यांनी नवीन अंगणवाडी सुरू करताना स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करून दिल्‍याचे मंत्री पाऊसकर म्‍हणाले.

उत्‍कृष्‍ट मुख्‍य सेविका रेखा नाईक
धारबांदोडा तालुक्यातील उत्‍कृष्ट मुख्य सेविका म्हणून रेखा नाईक, उत्कृष्ट सेविका म्हणून कोमल गावकर, उत्कृष्ट हेल्पर म्हणून उज्वला शिवडेकर यांचा सन्मान करण्यात आला. मंत्री विश्‍वजित राणे व मंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते यावेळी धारबांदोडा तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याणखात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील पूरग्रस्त अंगणवाडी सेविका सुलोचना गांवकर, उज्वला शिवडेकर, व जस्मीन कालेकर यांना आर्थिक मदत देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com