Goa: सालेलीतील युवकांनी श्रमदानाने केली रस्त्यांची साफ सफाई

झाडा-झुडुपांमुळे वाहतूकीला निर्माण झाला होता धोका (Goa)
Goa: सालेलीतील युवकांनी श्रमदानाने केली रस्त्यांची साफ सफाई
Youths of Saleli clearing trees and bushes along the road from Saleli to Honda, Goa. On 29 July, 2021.B D Mote / Dainik Gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात (Poriem Constituency) येणाऱ्या सालेली गावातील (Saleli Village) युवकांनी सामाजिक जबाबदारीचा वसा घेऊन, विविध सार्वजनिक स्वरुपाची कामे (Social Work) हाती घेतली आहेत, त्यात हल्लीच सालेली गडावर वृक्षारोपण करण्यात आले होते, त्यानंतर होंडा गावकरवाडा ते सालेली (Gaonkarwada, Honda To Saleli ) पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे छाटून रस्ता वाहतुकीसाठी (Clean Road by Cut Bushes, Trees) सुरळीत करण्यात आला.

Youths of Saleli clearing trees and bushes along the road from Saleli to Honda, Goa. On 29 July, 2021.
Goa: राज्यात जंगल कॉरिडॉरची गरज

भाजप सरकारच्या (BJP Govt.) काळात सालेली ते झर्मे (Saleli To Zarme) या रस्त्याचे काम मार्गी लागल्यानंतर या रस्त्यावरून दळणवळण यंत्रणा वाढलेली आहे, सदर रस्त्यामुळे झर्मे, मावशी, दाबे या भागातील नागरिकांना हा रस्ता जवळचा झाल्याने, होंडा, सांखळी व इतर ठिकाणी कामांवर जाणाऱ्या कामगार वर्ग रस्त्याचा वापर करीत आहेत. परंतु सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झुडपामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोका दायक बनला होता, याची दखल गावातील युवकांनी घेऊन श्रमदानाने हा रस्ता साफ केला. स्थानिक युवकांनी राबविलेल्या श्रमदानाच्या उपक्रमा (Labor Charity) बद्दल सदर भागातील नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करून अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com