Goa :मडगावात दोन फ्लॅटमध्ये चोरी; कॅमेरात चोरट्यांच्या हालचाली कैद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

आके-मडगाव येथील पॅराडाईस अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून अज्ञान चोरट्यांनी सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या अपार्टमेंटच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या

सासष्टी  ः आके-मडगाव येथील पॅराडाईस अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून अज्ञान चोरट्यांनी सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या अपार्टमेंटच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून पोलिस याचा वापर करुन चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना काल मध्यरात्री घटली. 

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. पहिल्या मजल्यावर राहणारे जेम्स परेरा हे कुटुंबासह फिरण्यासाठी गेले होते सकाळी घरी पोहचल्यार त्यांना चोरी झाल्याचे कळाले. दुसऱ्या मजल्यावर राहणारे कुंटुंबही फिरण्यासाठी गेले असून त्याच्या फ्लॅटमधून कितपत मुद्देमाल लंपास झाला आहे हे पोलिसांना कुटुंब परतल्यावर कळणार आहे. जेम्स परेरा यांचे फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने व अन्य वस्तू मिळून 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यास आला आहे. फ्लॅट फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांच्या हालचारी कॅमेरात कैद झाल्या असून त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

गृहिणींचे बजेट ढासळणार; एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ -

संबंधित बातम्या