Goa: राज्यात कोरोनामुळे आज एकही बळी नाही

गोव्यात (Goa)आजपर्यंत 3299 जणांचा करोनामुळे मृत्यु झाले आहेत. गोवाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 400 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यु झाले.
आज ता. 25 सप्टेंबर  रोजी 19,585 येवढे लसीकरण  झाले.
आज ता. 25 सप्टेंबर रोजी 19,585 येवढे लसीकरण झाले.Dainik Gomantak

पणजी: राज्यात आज कोरोनामुळे (Corona) एकही बळी गेला नाही. दुसरीकडे आज 65 नवे कोरोना (Covid 19) बाधीत सापडले तर 84 कोरोना बाधीत बरे झाले. आजच्या दिवशी राज्यात 946 सक्रिय कोरोना बाधीत आहेत. आज 5376 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.59 टक्के येवढी आहे. राज्यात आजपर्यंत 18,36,136 येवढे लसीकरण (Vaccination) झाले आहे. यात 11,94,356 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 6,41,780 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज ता. 25 सप्टेंबर रोजी 19,585 येवढे लसीकरण झाले.

आज ता. 25 सप्टेंबर  रोजी 19,585 येवढे लसीकरण  झाले.
Goa Covid-19: मृतांच्या खऱ्या आकडेवारीत पुन्हा घोळ
पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत डिसोजा बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबी बागकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत डिसोजा बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबी बागकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.Dainik Gomantak

दरम्यान, गोव्यातील कोविड रुग्णांच्या मृत्युंसाठी पुर्णपणे जबाबदार भाजप सरकार जबाबदार असून, कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना फक्त दोन लाखांचे सानुग्रह अनुदान देऊन त्याद्वारे हे सरकार प्रसिद्धी मिळवत आहे. गोव्यात डॉ. प्रमोद सावंत सरकारने कोविड रुग्णांची हत्याच केली आहे. असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते तुलीयो डिसोजा (Congress spokesman Tuliyo D'Souza) यांनी केला आहे.

पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत डिसोजा बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबी बागकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, गोव्यात आजपर्यंत 3299 जणांचा करोनामुळे मृत्यु झाले आहेत. गोवाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 400 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यु झाले. सरकारने मृत्युची नोंदणी करण्यातही घोळ घातल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकार आज कोविड मदत देताना फोटो काढुन प्रसिद्धी घेते. मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना दाखवण्याचे भान सरकारला राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल जनतेची माफी मागावी अशी मागणी डिसोजा त्यांनी केली.

कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक कोराना काळात दगावले त्यांना नोकरी देईल. असे सांगून आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर करण्याचे सांगुन 22.50 कोटींचा घोटाळा सरकारने केल्याचा आरोप डिसोजा यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com