
Goa TMC Shashank Desai joins Trinamool
कुंकळ्ळी: कुंकळ्ळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शशांक देसाई यांनी काल आपल्या सुमारे 300 समर्थकांसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश (Goa TMC) केला. या नव्या राजकीय घडामोडीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
आंबावली, पारोडा, चांदोर, गिर्दोली आणि कुंकळ्ळी येथील देसाई यांच्या समर्थकांनी तृणमूलचा (TMC) झेंडा हाती घेतला. त्यात काँग्रेस आणि भाजपचेही (BJP) काही कार्यकर्ते होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शशांक देसाई यांनी ज्योकिम आलेमाव यांना पाठिंबा दिला होता. यावेळी ते म्हणाले की, केवळ ममता बॅनर्जीच भाजपशी लढा देऊ शकतात आणि तृणमूल काँग्रेस पक्षच भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ शकतो. ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘युवा कार्ड’ योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.
युरी आलेमाव यांच्यावर आरोप करताना देसाई म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन काही श्रीमंत उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी पैसा ओतणार आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. मतदारसंघाबाहेरील युरी यांना पाठिंबा देऊन या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांचा अपमान करू नका. दरम्यान, यावेळी तृणमूलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.