Ironman 70.3 Goa: आता आयर्नमॅन स्पर्धा कायमस्वरूपी होणार गोव्यात CM प्रमोद सावंत यांची घोषणा...

आयर्नमॅन 70.3 स्पर्धा आता कायमस्वरूपी गोव्यात होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
Ironman 70.3 Goa
Ironman 70.3 GoaDainik Gomantak

गोवा: आयर्नमॅन 70.3 स्पर्धा आता कायमस्वरूपी गोव्यात होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. ते म्हणाले, “आम्ही गोव्याला क्रीडा स्पर्धेचे ठिकाण बनवू इच्छितो ज्यामुळे पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.” बंगळुरू दक्षिण मतदारसंघाच्या खासदार तेजस्वी सूर्या यांच्या उपस्थितीत मिरामार येथे आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेला हिरवा कंदील दाखविण्यात आला यावेळी सावंत बोलत होते.

(Goa to be permanent destination for Ironman Triathlon says cm pramod sawant)

Ironman 70.3 Goa
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा बदल....

मुंबईचा निहाल बेग ठरला 'आर्यनमॅन'; गतविजेत्या बिस्वरजित सायखोमला टाकले मागे

 गोव्यातील पणजी येथे रविवारी (दि.13) पार पडलेल्या आर्यनमॅन स्पर्धेत आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी निहाल बेग याने बाजी मारली आहे. एरोस्पेस अभियंता असलेला निहाल बेग आर्यनमॅन ठरला आहे. निहालने गतविजेत्या भारतीय लष्कराच्या बिस्वरजित सायखोम यांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे केला आहे. रविवारी सकाळी मिरामार बीच येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता.

आर्यनमॅन स्पर्धेसाठी जगभरातील 1,450 स्पर्धेक पात्र ठरले होते

गोव्यात पार पडलेल्या विश्वविख्यात आर्यनमॅन स्पर्धेसाठी जगभरातील 1,450 स्पर्धेक पात्र ठरले होते. आर्यनमॅन स्पर्धा जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा असून, यात पोहणे, सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. गोव्यात झालेल्या स्पर्धेत 1.9km पोहणे, 90 km सायकलिंग आणि 21 km धावणे यांचा समावेश करण्यात आला होता. निहालने 4 तास 29 मि. आणि 45 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. पोहण्यात मी थोडा कमजोर आहे पण, धावण्यात पटाईत असल्याने यावेळी सायखोम यांना मागे टाकण्यात यशस्वी झालो अशी प्रतिक्रिया निहालने स्पर्धा जिंकल्यानंतर दिली.

Ironman 70.3 Goa
Goa Crime: दारुच्या नशेत कंरजाळे किनाऱ्यावर एकाचा खून; पैशांच्या व्यवहाराचा होता वाद

4 तास 37 मि. आणि 21 सेकंदात ही स्पर्धा केली पूर्ण

याशिवाय भारतीय लष्करात काम करणारे बिस्वरजित सायखोम यांनी 4 तास 37 मि. आणि 21 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. तर, 40 वर्षीय पंकड धिमान यांनी 4 तास 40 मि. आणि 41 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला.

तसेच महिला गटात, स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीकने 05:10:46 या वेळेसह पहिले क्रमांक पटकावला, तर भारताच्या टीम शर्माने 05:23:21 वेळेसह दुसरा आणि केतकी साठे या महिलेने 05:46.51 वेळेसह तिसरा क्रमांक पटकावला.

काय आहे 'आयर्नमॅन'

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. क्रीडा विश्वात आयर्नमॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानले जाते. अनेक ट्रायअॅथलीट या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com