Goa: कुकळ्ळीच्या नगरसेवकांनी घेतली विरोधी पक्षातील नेत्यांची भेट

नगरपालीकेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे विकास कामांवर होतो परिणाम, नगरसेवकांचे गाऱ्हाणे (Goa)
Goa: कुकळ्ळीच्या नगरसेवकांनी घेतली विरोधी पक्षातील नेत्यांची भेट
कुकळ्ळीच्या नगरसेवकांनी घेतली विरोधी पक्षातील नेत्यांची भेट (Goa)Dainik Gomantak

Goa: मडगाव नगरपालीका मंडळाने (Margao Municipal Board) संमत केलेले प्रस्ताव मार्गी लावणे, हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. कुकळ्ळी नगरपालीकेतील (Cuncolim Municipality) समस्या व प्रश्नावर मी वरिष्ट अधिकाऱ्यांकडे बोलुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Opposition Leader Digambar Kamat) यांनी आज त्यांची भेट घेतलेल्या कुक्कळी नगरपालिकेत सत्तेत असलेल्या 9 नगरसेवकांना (Cuncolim corporator) दिले.

नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक (Cucolim Mayor Laxman Naik) यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष ॲंथनी वाझ, नगरसेवक गौरी देसाई, उद्देश देसाई, लॅंड्री मास्कारेन्हस, जमीरा पेरैरा, रेखा फर्नांडीस, रायमुंडो डिसोजा व जॉन डायस यांनी आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांची भेट घेवुन कुक्कळी नगरपालीकेतील विवीध समस्यांवर चर्चा केली व त्यांच्या मदतीची विनंती केली. यावेळी माजी मंत्री ज्योकीम आलेमाव (Former Minister Joaquim Alemao) व युवा कॉंग्रेस नेते युरी आलेमाव उपस्थित होते.

Goa: काजू फेणी ‘गल्ला’ जमवण्‍यात कमी!

गोव्यातील भाजप सरकारचे दिवस भरले असुन, २०२२ मध्ये कॉंग्रेसचे सरकार गोव्यात स्थापन होणार आहे, असे दिगंबर कामत यांनी सर्व नगरसेवकांना सांगितले. सन २००७ ते २०१२ या कॉंग्रेसच्या राजवटीतच कुकळ्ळीचा विकास झाला याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकुन घेतले व त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक म्हणाले.

गोव्यात केवळ कुकळ्ळी नगरपालीकेत कॉंग्रेस पक्षाने पुरस्कृत केलेले पुर्ण बहुमतातील नगरपालीका मंडळ असुन त्याचा आम्हाला अभिमान आहे. कुकळ्ळीवासीयांना विकास व चांगली सेवा देण्यास सर्व नगरसेवक वचनबद्ध आहेत. संघटीतपणे काम करुन कुकळ्ळीचा विकास करण्याचे ध्येय बाळगलेल्या सर्व नगरसेवकांचा मी ऋणी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले. कुकळ्ळी नगरपालीकेतील मुख्याधिकारी व पालिका अभियंता यांचा मनमानी कारभार व त्यामुळे विकास कामांवर होणारा परिणाम यावर सर्व 9 नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेते कामत यांचे लक्ष वेधले व सदर अधिकारी स्थानिक आमदार व सत्ताधारी भाजप सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचे दिगंबर कामत यांच्या निदर्शनास आणुन दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com