Goa Tourism: किनारी भागातील चेन्गिंग रुम आणि शौचालयांना टाळेच

हंगामी स्वरूपाचे उभारलेले शौचालय, चेन्गिंग रुम अजून खुले झाले नसल्याने पर्यटकांची गैरसोय (Inconvenience to tourists)
Goa Tourism:  किनारी भागातील चेन्गिंग रुम आणि शौचालयांना टाळेच
मोरजी किनाऱ्यावर हंगामी स्वरूपाचे उभारलेले शौचालय, चेन्गिंग रुमदैनिक गोमन्तक

मोरजी: पर्यटन खात्याचा पर्यटन हंगाम (Goa Tourism) ऑक्टोबर महिन्यापासून पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल आणि केरी तेरेखोल या सर्वांगसुंदर किनारी भागात सुरु झाला आहे. मात्र या किनारी भागात हंगामी स्वरूपाचे उभारलेले शौचालय, चेन्गिंग रुम अजून खुले झाले नाही. कंत्राटदाराने या शौचालायाला टाळे ठोकलेले आहे. त्यामुळे पर्यटकांची बरीच गैरसोय होत आहे.

मोरजी किनाऱ्यावर हंगामी स्वरूपाचे उभारलेले शौचालय, चेन्गिंग रुम
घरमालकाच्या घरात चोरी करून पळालेल्या चोरट्यास चोवीस तासांत अटक

पर्यटनातून मिळतो करोडो रुपयांचा महसूल पण सोयीसुविधांचा अभाव

ऑक्टोबर ते मे पर्यंत या किनारी भागात पर्यटकांची रेलचेल असते. सरकारला या व्यवसायातून करोडो रुपये दरवर्षी महसूल मिळत असतो. मात्र सरकारकडून पर्यटन खात्याकडून या किनारी भागात कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. गेल्यावर्षी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या पुढाकाराने किनारी भागात हंगामी स्वरूपाचे चेन्गिंग रुम, शौचालय उभारलेले आहेत. शिवाय अपंग व्यक्तीसाठी खास शौचालयाची सोय या ठिकाणी केली आहे. मात्र या सुविधा आजही बंदच आहेत. या सुविधाना टाळे ठोकल्याने पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मोरजी किनाऱ्यावर हंगामी स्वरूपाचे उभारलेले शौचालय, चेन्गिंग रुम
सांकवाळ सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव

सोयी सुविधा उभारण्यासाठी सीआरझेडचा कायदा, मग हॉटेल्सच काय ?

या किनारी भागात पक्क्या स्वरूपाचे चेन्गिंग रुम, शौचालय या सोयी सुविधा उभारण्यासाठी सीआरझेड कायद्याआड येत असतो. मात्र किनारी भागात मोठ मोठी हॉटेल्स बिगर गोमंतकीयांनी उभारली त्यांना कायदा लागत नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पर्यटन हंगाम सुरु झाल्यामुळे चेन्गिंग रुम खुले करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.