Goa Tourism Dept: बेकायदेशीर व्यवसाय प्रकरणी पर्यटन खात्याची 11 हॉटेलांना नोटीस

कोलवा येथील तीस स्टॉलचे अतिक्रमण हटवले
Goa Tourism Dept
Goa Tourism DeptDainik Gomantak

गोवा पर्यटन खात्याने (Goa Tourism Dept) अकरा हॉटेल व्यवसायांना नोटीस पाठवली आहे. पर्यटन खात्याकडे नोंदणी न करता, बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवल्याचा ठपका खात्याने या हॉटले व्यवसायिकांवर ठेवला आहे. दरम्यान, खात्याने नोटीस बजावली असून, हॉटेल व्यवसायिकांना एक लाख रूपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाणार आहे.

(Goa tourism Department issues notices to 11 hotel properties And illegal extensions at Colva demolished)

Goa Tourism Dept
IFFI: 'द काश्मीर फाईल्स'सह 15 भारतीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांत प्रतिष्ठेच्या 'सुवर्ण मयुर'साठी चुरस

तसेच, पाणी आणि वीज जोडणी देखील बंद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या अकरा हॉटेलमध्ये वेल्हा, पणजी, कांदोळी, तिसवाडी, कळंगुट येथील हॉटेलांचा समावेश आहे.

Goa Tourism Dept
Goa CET Scrapped: मोठी बातमी! गोवा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कायमची रद्द

कोलवा येथील तीस स्टॉलचे अतिक्रमण हटवले

कोलवा बीच येथील तीस स्टॉलचे अतिक्रमण पर्यटन खात्याने मंगळवारी हटवले. गोवा किनारपट्टी प्राधिकरणच्या वतीने याबाबत सूचना दिली होती. अतिक्रमण हटवण्याची कारवाईवेळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काही मालमत्ता धारकांना अतिक्रमण कारवाईला विरोध करत आंदोलन करत, अतिक्रमण हटवण्यासाठी वेळ मागितला. मात्र, खात्याने कारवाई करत अतिक्रमण हटवले.

गोवा पर्यटन खात्याने 1988 साली कोलवा येथे तीस स्टॉल उभारले होते. सर्व स्टॉल भाड्याने देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com