Tourism Revenue: पर्यटन विकास महामंडळ सुसाट, 14 कोटींचा नफा

मायकल लोबो यांच्‍या प्रश्‍नाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे उत्तर
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

पणजी: गोवा पर्यटन विकास महामंडळाने मागील चार वर्षात 166 कोटी 70 लाख, तर 2021-22 मध्ये एकूण 13 कोटी 94 लाख रूपयांचा नफा कमावला. अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मायकल लोबो यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) मालकीची राज्यात एकूण 12 हॉटेल्स आहेत. तर पर्यटन खात्‍याची कळंगुट (Calangute) येथील 5 हजार 841 आणि 5 हजार 278 चौरस मीटर पार्किंगची जागा, कोलवा शॉपिंग कॉम्‍लेक्‍समधील (Colva Shopping Complex) 30 स्‍टॉल्‍स, 6 दुकाने, फोंडा एज्‍युकेशन सोसायटीला 99 वर्षांच्‍या कराराने दिलेली 35 हजार 744 चौरस मीटरची जागा, राज्‍यातील विविध ठिकाणी 340 नारळाची झाडे अशी खात्याची मालमत्ता असल्‍याचे लेखी उत्तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Tourism Minister Rohan Khaunte) यांनी विधानसभा अधिवेशनात दिले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो (MLA Michael Lobo)) यांनी यासंबंधीचा अतारांकित प्रश्‍न विचारला होता.

Goa Tourism
Accident: आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात, सत्तरीत बत्ती गुल

गोवा पर्यटन विकास महामंडळाने (Goa Tourism Development Corporation) गेल्‍या 4 वर्षांत 166 कोटी 70 लाख 46 हजार 715 रुपयांचा महसूल मिळवला, तर एकूण खर्च 164 कोटी 57 लाख 12 हजार 145 रुपये झाला. तसेच महामंडळाने कोणतेही हॉटेल किंवा कॉटेज भाडेतत्त्वावर दिले नसल्‍याचेही या उत्तरात म्‍हटले आहे. महामंडळाला 2021-22 मध्ये एकूण 13 कोटी 94 लाख 36 हजार 775 रुपये इतका अंदाजित नफा झाल्‍याचेही पर्यटनमंत्र्यांनी म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com