Goa Tourism News: 'पर्यटन खात्याचे नियम धाब्यावर बसवून व्यावसायिकाचे अतिक्रमण'

Goa Tourism News: मोरजीत अतिक्रमण : व्यावसायिकांच्या पर्यटन खात्याला वाकुल्या
Goa Tourism| Goa News
Goa Tourism| Goa NewsDainik Gomantak

Goa Tourism News: मोरजी पंचायत क्षेत्रातील किनारी भागात परप्रांतीय व्यावसायिकांनी खासगी जागेत शॅक्स रेस्टॉरंट उभारलेली आहेत. त्यातील काहींना पाच लाकडी पलंग घालण्यास पर्यटन खात्याने परवानगी दिली. मात्र, त्याऐवजी या व्यावसायिकांनी शेकडो लाकडी पलंग घालून अतिक्रमण केलेच, पण पर्यटन खात्याचे नियम धाब्यावर बसवून खात्याला वाकुल्या दाखवल्याचे दिसून येते.

याप्रकरणी पर्यटन खाते कारवाईस टाळाटाळ का करते? असा सवाल एक पर्यटक अमोल ठाकूर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. पर्यटन खाते सरकारी जागेत शॅक्स उभारणाऱ्या व्यावसायिकांना वीस लाकडी पलंग घालण्यास परवानगी देते.

तर खासगी जागेत जे कुणी शॅक्स घालतात त्यांना पाच लाकडी पलंग घालण्याची मुभा असते. परंतु प्रत्यक्षात खासगी जागेत शेकडो पलंग घालून किनारा अडवला जातो. त्यामुळे मान्यताप्राप्त शॅक्सच्याही व्यवसायावर परिणाम होतो.

जप्त केलेले पलंग पुन्हा थाटले !

दोन महिन्यापूर्वी विठ्ठलदास वाडा किनारी भागात एका व्यावसायिकाने कसलेच परवाने न घेता शेकडो लाकडी पलंग आणि टेबल घालून किनाऱ्यावर अतिक्रमण केले होते. त्यावेळी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून शेकडो लाकडी पलंग जप्त केले होते.

मात्र, दुसऱ्या बाजूने त्याच रात्री ते लाकडी पलंग एका मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे त्या व्यावसायिकाला परत दिले. या घटनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्या व्यावसायिकाने किनारी भागात शेकडो लाकडी पलंग थाटले होते.

Goa Tourism| Goa News
Goa Cricket Association: गैरव्यवहाराचे आरोप; GCA चा सामना आता न्यायालयात रंगणार

किनारे होताहेत बदनाम !

वाढते गुन्हे तसेच अनैतिक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणात किनारे बदनाम होत असल्याने आता किनाऱ्यांपलीकडील पर्यटन स्थळे शोधण्याचा प्रयत्न पर्यटकांकडून होत आहे. किनारे म्हणजे ध्वनिप्रदूषण, ड्रग्स, गोंगाट, अतिक्रमण याशिवाय पार्किंग व्यवस्थेची गैरसोय, चेंजिंग रूम, शौचालय या सुविधा किनारी भागात पुरेशा नसल्याने पर्यटक इतरत्र आपला मोर्चा वळवत असल्याचे चित्र दिसते. पर्यटन हंगामात काही व्यावसायिकांचा कमी वेळात जास्त पैसा कमवण्याकडे कल असतो. काहीजण ड्रग्स व्यवहार आणि दलाली करून पैसा कमवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com