'Home stay' संकल्पनेला प्रोत्साहन देणार, गोवा पर्यटन; आयटी राजधानी बनवणार!

Goa मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासाठी घरे भाडेपट्टीवर घेतात.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Goa: कोरोना महामारीच्या काळात घरी राहून काम करण्याची पद्धत रूढ सुरू झाली होती. त्या काळात मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासाठी घरे भाडेपट्टीवर घेत होते. आता पर्यटन खाते हीच संकल्पना हाती घेऊन ‘होम स्टे’ला (Home stay) प्रोत्साहन देणार आहे.

आयटी क्षेत्रातील लोकांना गोव्यात येण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोवा ही पर्यटन आणि आयटी राजधानी बनवण्याचे धोरण तयार केले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज दिली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘होम स्टे’ ही संकल्पना कोरोना महामारीच्या काळात रूढ झाली.

एकदा मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर राज्यातील पर्यटनाचे स्वरूप बदलणार आहे. कारण विमानांची संख्या वाढणार असून ‘होम स्टे’लाही मागणी वाढणार आहे. ‘होम स्टे’ संकल्पनेचे सादरीकरण 18 ते 21 सप्टेंबर या कालावधीत केले, अशी माहिती खंवटे यांनी दिली.

Rohan Khaunte
Goa Crime: मडगाव रेल्वे स्टेशनवर थरार; पर्यटक तरुणाने कापला स्वतःचाच गळा

गोव्यात हिंटरलॅण्ड, साहसी, तसेच आरोग्य पर्यटन वाढवण्यासंदर्भात केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. सध्या ई-व्हिसाविषयी समस्या निर्माण झाल्याने ‘युके’ मधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होऊ शकते. यासाठी केंद्रीय मंत्र्यांना या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करण्यात येईल. हल्लीच पर्यटन परिषदेत भेट झाली. तेव्हा मंत्र्यांनी गोव्याला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

Rohan Khaunte
मामलेदार राहुल देसाई यांच्या नियुक्तीला 'Goa First'चा आक्षेप

गैरव्यवहारांना चाप: पर्यटन क्षेत्रात बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्याची प्रतिमा मलीन केली जात असून पर्यटक व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी गोवा सुरक्षित असल्याचा संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहनही खंवटे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com