Goa Tourism: परवाना रद्द केल्यास रस्त्यावर उतरणार; पर्यटन खात्याच्या धोरणास शॅक मालकांचा विरोध

शॅक मालक कल्याणकारी सोसायटी गोवा या संघटनेने पर्यटन खात्याच्या नवीन शॅक धोरणास विरोध केला आहे.
Goa Tourism |Shacks
Goa Tourism |ShacksDainik Gomantak

Goa Tourism: शॅक मालक कल्याणकारी सोसायटी गोवा या संघटनेने पर्यटन खात्याच्या नवीन शॅक धोरणास विरोध केला आहे. पर्यटन खात्याला कुठल्याच शॅकवाल्यांचे परवाने रद्द करू दिले जाणार नाही, तसे केल्यास रस्त्यावर उतरणार, अशी आक्रमक भूमिका घेतली. मुळात पर्यटन खाते शॅकवाल्यांकडून भरमसाट शुल्क आकारतात, परंतु मूलभूत सुविधा देत नसल्याने या राज्यभरातील शॅकवाल्यांनी पर्यटन खात्यावर टीका केली.

आज सकाळी शॅकमालक कल्याणकारी सोसायटी गोवा यांच्या बॅनरखाली राज्यातील शॅकमालकांची सभा कळंगुट पंचायत सभागृहात पार पडली. यावेळी शॅकमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटन खात्याने अनेक शॅकवाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. शॅकवाले हे थेट उघड्यावर सांडपाणी, किचन वेस्ट सोडतात.

तसेच काहींनी बोअरवेल मारल्याच्या यात ठपका आहे. ‘पर्यटन खात्यास शॅकवाल्यांना मूलभूत सुविधा पुरविता येत नसल्यास किंवा नळाचे पाणी, मलनिस्सारणाची वेगळी वाहिनी पुरवता येत नसल्यास पर्यटन खात्याने तसे सांगावे. आम्ही स्वतः या मूलभूत सुविधा निर्माण करू.

मात्र, पर्यटन खात्याने आमच्याकडून पुढील सहा वर्षांसाठी कुठलेही शुल्क आकारू नये’, अशी मागणी संघटनेने केली. यावेळी सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो, खजिनदार सिरील सिल्वेरा, सोसायटीचे सदस्य विद्याधर दाभोळकर, शॅकमालक श्रीधर गोलतेकर हे उपस्थित होते.

Goa Tourism |Shacks
Mahadayi Water Dispute: गोव्याचे जलस्रोत उद्ध्वस्त करण्याचा डाव; म्‍हादईच्या पाण्यासाठी 1 हजार कोटी रुपये

सरकारवर टीका

शॅक हा पारंपरिक व्यवसाय शॅकवाल्यांनी सांभाळून ठेवला आहे. मात्र, आता सरकार हा धंदा बाहेरील लोकांच्या हातात देण्यास पाहत आहे. पर्यटन खाते म्हणे शॅक हे स्वतः बांधून त्याचा लिलाव करणार आहेत, असे समजते. मात्र, आम्हाला हे धोरण मान्य नाही, असे सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो यांच्यासह इतर शॅकमालकांनी यावेळी सांगितले.

शॅकवाल्यांची पर्यटन खात्याकडून सतावणूक सुरू आहे. शॅकवाले समुद्रात सिव्हरेजचे पाणी सोडतात, असा आरोप आहे. किनारी भागातील इतर मोठे क्लब व रेस्टॉरंटवाले सर्रास समुद्राच्या पाण्यात सांडपाणी सोडतात. आम्ही सिव्हरेज व इतर मूलभूत सुविधा उभारण्यास तयार आहोत. सरकारने पुढील सहा वर्षे आमच्याकडून कुठल्याच प्रकारचे शुल्क आकारु नये. - क्रुज कार्दोज, अध्यक्ष, शॅक संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com