Varanasi Overtaking Goa : नव्या वर्षात पर्यटकांची गोव्याकडे पाठ, 'काशी'ला पसंती

यावर्षी अनेकांनी देवाच्या आशीर्वादाने वर्षाची सुरुवात करण्यासाठी धार्मिक शहरांना भेट देणे पसंत केलं
Tourist Increased in Varanasi For New year Compared to Goa
Tourist Increased in Varanasi For New year Compared to GoaDainik Gomantak

सुट्टी म्हटलं आपसूकच डोक्यात पहिला विचार येतो गोव्याचा. आयुष्यात एकदातरी गोव्यात फिरायला जायचंच अशी अनेकांची इच्छा असते. यावेळी काहींचे प्लॅन प्रथेप्रमाणे फसतात तर काहीजण खरंच गोव्यात क्वालिटी टाईम घालवतात.

त्यात थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हटलं की हमखास देश-परदेशातले लोक गोव्यात दाखल होतात. दरवर्षी डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि नवीन वर्षांचा पहिला आठवडा गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदाचं चित्रं थोडं वेगळं आहे. यावर्षी पर्यटकांची पावलं गोव्याकडे न वळता काशीकडे वळाली असं हॉटेल्स बुकिंगच्या आकडेवारीवरुन लक्षात आलं. (Tourist Increased in Varanasi For New year)

यावर्षी अनेकांनी देवाच्या आशीर्वादाने वर्षाची सुरुवात करण्यासाठी धार्मिक शहरांना भेट देणे पसंत केलं, आणि वाराणसीमध्ये हॉटेल बुकिंगमध्ये वाढ हा त्याचा पुरावा आहे. OYOचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांच्या मते, हॉटेल बुकिंगच्या बाबतीत वाराणसीने गोव्याला मागे टाकलं आहे.

ते म्हणाले की, 'गोव्यातील बुकिंग तासाभराने वाढत आहेत. पण गोव्याला मागे टाकत लोकांनी वाराणसीमध्ये जास्त बुकिंग केले आहेत.'

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. शिमला, गोवा, आग्रा आणि वाराणसीसह लोकप्रिय ठिकाणी लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी केली. (Varanasi Overtaking Goa)

...यामुळे पर्यटकांची वाराणसीला पसंती

आधीच लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या वाराणसीमध्ये गेल्या एका वर्षात दोन मोठे कार्यक्रम झाले होते. पहिले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्विकसित मंदिर संकुलाचे उद्घाटन केले आणि दुसरे काशी तमिळ संगम गेल्या महिन्यात आयोजित केले होते. या दोन्ही घटनांनी वाराणसीच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी वाराणसीमध्ये पुनर्विकसित श्री काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले होते. तेव्हा पंतप्रधानांनी नमूद केले होते की पूर्वी मंदिराचे क्षेत्रफळ केवळ 3000 स्क्वेअर फूट होते जे सुमारे 5 लाख स्क्वेअर फूट केले गेले. मंदिर परिसर आता 50,000 - 75,000 भाविकांना मंदिर आणि मंदिर परिसरात भेट देण्याची परवानगी देते. भारत आपला गमावलेला वारसा पुनरुज्जीवित करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यामुळे इकडे लोकांची पसंती जास्त वाढल्याचे दिसून आले.

पर्यटकांनी गोव्याकडे फिरवली पाठ?

पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या गोव्यात त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे. याची खरतर अनेक कारणे आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकारने रात्री 10 नंतर समुद्रकिनाऱ्यावर संगीत पार्ट्यांवर बंदी घातल्यामुळे रात्रभर मजामस्ती करण्याच्या उद्देशाने गोव्यात दाखल झालेले पर्यटक नाराज होत आहेत.

'गोव्यात येऊन जर रात्री 10 नंतर पार्टी करता येत नसेल तर आमचा गोव्यात येऊन काय उपयोग? मग आम्ही दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो', असे मत अनेक पर्यटकांनी व्यक्त केले. कदाचित म्हणून पर्यटक गोव्यात येण्याऐवजी इतर ठिकाणांना भेट देत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. त्यामुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com