'गोवा पर्यटन धोरण २०२०' अधिसूचित

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाने मंजूर केलेले 'गोवा पर्यटन धोरण २०२०' शुक्रवारी अधिसूचित करण्यात आले. गोव्याला सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळांपैकी एक बनवण्याचे लक्ष्य तसेच वेगवान रविण्यावर जोर देण्यात आला आहे.

पणजी : गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाने मंजूर केलेले 'गोवा पर्यटन धोरण २०२०' शुक्रवारी अधिसूचित करण्यात आले. गोव्याला सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळांपैकी एक बनवण्याचे लक्ष्य तसेच वेगवान, विश्वासार्ह, स्वस्त आणि आरामदायक प्रवास, वाहतूक आणि सहाय्य सेवा पुरविण्यावर जोर देण्यात आला आहे.

गोव्याला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आोळख मिळवून देण्याचे उद्दीष्ट ठेवत पर्यटकांना एक उत्तम अनुभव देण्यासाठी गोव्यातील ऐतिहासिक, वंशीय, नैसर्गिक, सांस्कृतिक स्थळे आणि गोव्यातील आकर्षणे दर्शविण्याविषयीही विचार केला गेला आहे.
 

संबंधित बातम्या