Goa Tourism : ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ ठरेल फ्लॉप!

पर्यटन व्यावसायिक : अपयशी योजनेवर गुंतवणूक म्‍हणजे पैशांचा अपव्यय
Goa Tourism
Goa TourismGomantak Digital Team

Goa Tourism : राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा पुन्हा सुरू करणे हा फ्लॉप शो ठरेल असे पर्यटन क्षेत्रातील संबंधितांना वाटते. अशा अयशस्वी संकल्पनेवर गुंतवणूक करणे म्हणजे सरकारी पैशांचा अपव्यय होईल, असे मत पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

पर्यटकांना शहराची सैर घडविण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा पुन्‍हा सुरू करण्यास उत्सुक आहे. ही सेवा लवकरच गोव्यात सुरू होणार आहे. या बसेस शहरातील मार्गांचा वापर करणार असून काही नवीन मार्ग नंतर सुरू करण्यात येणार आहेत. पर्यटकांना गोव्यातील पर्यटनस्थळे, शहरांमध्‍ये फेरफटका मारण्यात या बसेस उपयोगात येणार असल्याची माहिती पर्यटन विभागातील सूत्रांनी दिली.

Goa Tourism
Knee Surgery: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर 'हे' काम करणे टाळा

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे (टीटीएजी) सदस्य साविओ मसाईस म्‍हणाले की, मला वाटत नाही की ही बससेवा गोव्यात चालेल म्‍हणून. आमच्याकडे तसे पर्यटक येत नाहीत. भाड्याने दुचाकी, कार आणि पर्यटक टॅक्सी इतक्या लोकप्रिय आहेत की कोणीही या हॉप ऑन हॉप ऑफ बसेसचा वापर करणार नाही.

सरकारला ही सेवा पुन्हा सुरू करावयाची असेल तर सरकारी तिजोरीचा पैसा वाया जाऊ देण्‍याचा प्रकार ठरेल. या सेवेतून सरकारला काही महसूल मिळणार नाही. त्‍यामुळे सरकारने विचार करावा.

Goa Tourism
Power Shutdown in Goa: गोव्यात उद्या 'या' भागामध्ये वीजपुरवठा राहणार बंद

निश्‍चित आराखडा तयार करावा

जर पर्यटन विभाग गोव्यात ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी काही वर्षांपूर्वी ती का अयशस्वी झाली याची कारणे शोधून काढली पाहिजेत. पर्यटकांची अडचण न होता या बसेस कशा, कुठे आणि केव्हा चालवतील याचा आराखडा असावा. गोव्यात पावसाळ्यात आणि कडक उन्हाळ्यात या बसेस चालतील असे वाटत नाही. सरकारसाठी निश्चितच ही एक डोकेदुखी ठरेल आणि सरकारी पैशांचा अपव्यय होईल, असे वास्को येथील कनक ट्रॅव्हल्सचे मालक सिद्धप्पा कामकेरी म्हणाले.

Goa Tourism
Nilesh Cabral: पणजीतील खोदकामाबाबत काय म्हणाले सावर्जनिक बांधकाम मंत्री, वाचा सविस्तर...

‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा पुन्हा एकदा अपयशी ठरेल. या बसेस फक्त पर्यटन हंगामात चालतील आणि त्‍याचा परिणाम आमच्या टुरिस्ट टॅक्सींवरही होणार आहे. हीच बससेवा काही वर्षांपूर्वी सुरू करण्‍यात आली होती. पण ती फ्लॉप ठरली. सरकारने अशा अयशस्वी प्रकल्पांवर पैसा वाया घालवू नये.

चेतन कामत, गोवा टुरिस्ट टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com