Goa Shack Business: यंदाचा पर्यटन हंगाम आधीच्या वर्षांच्या तुलनेत समाधानकारक; पण शॅक मालक म्हणतात...

या वर्षाचा पर्यटन हंगाम आता संपत असल्याने सासष्टी किनारपट्टीवरील शॅक मालकांनी त्यांची बांधकामे तोडण्यास सुरुवात केली
Goa Beach Shacks
Goa Beach ShacksDainik Gomantak

Goa Shack Business: या वर्षाचा पर्यटन हंगाम आता संपत असल्याने सासष्टी किनारपट्टीवरील शॅक मालकांनी त्यांची बांधकामे तोडण्यास सुरुवात केली आहे.

बाणावली आणि कोलवा या अधिक लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक अजूनही उभे असताना, कासावली आणि मोबोर समुद्रकिनाऱ्यांवरील तात्पुरत्या रचनेत उभारलेले शॅक तोडण्यास काम आधीच सुरू झाले आहे.

Goa Beach Shacks
CM Pramod Sawant : राज्यात रात्री उशिरापर्यंत बससेवा

मागील वर्षांच्या तुलनेत हा हंगाम ठीक असल्याचे मत शॅक मालकांनी व्यक्त केले. असे असले तरीही काही काळापासून सुरू असलेल्या अनेक समस्यांबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. गोव्याचे पर्यटन धोरण, मॉडेल शॅकचा वादग्रस्त प्रस्ताव आणि शॅकच्या स्वयंपाकघरातील कचरा आणि शॅक्समधून निर्माण होणारे सांडपाणी यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था, असे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.

कोरोना साथीच्या आजारामुळे पर्यटन शॅक धोरण 2019-22 अतिरिक्त वर्षासाठी वाढविण्यात आले असले तरी, नवीन पर्यटन धोरणाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. दीर्घकाळापासून पर्यटन उद्योगात असलेल्या स्थानिकांसाठी सरकारची प्रस्तावित `1 कोटींची 'मॉडेल शॅक' मायावी ठरेल, असे शॅक मालकांनी सातत्याने सांगितले आहे.

ऑल गोवा शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोझो म्हणाले की, ते गोव्याच्या शॅक मालकांना पर्यटन व्यवसायात प्राधान्य देण्याची मागणी इथून पुढेही करत राहतील.

सरकारचे नवीन धोरण आमच्यासाठी काय असेल याची आम्हाला खात्री नाही. आम्ही सतत म्हणत आलो आहोत की गोव्यातील शॅक मालकांना `1 कोटी खर्चाचे मॉडेल शॅक उभारणे परवडणारे नाही. ते आपल्या आवाक्याबाहेर आहे. आम्ही राज्य सरकारला निवेदन सादर करत आहोत आणि आम्ही जूनमध्ये आणखी एक निवेदन पाठवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com