पर्यटकांच्या मदतीसाठी गोव्यात टुरिस्ट पोलीस तैनात

राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस खाते काम करत आहे.
पर्यटकांच्या मदतीसाठी गोव्यात टुरिस्ट पोलीस तैनात
Shobhit D Saxena, SP North GoaTwitter/ ANI

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. राज्यात पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतांनाही दिसत आहे. गोव्यातील रस्त्यावर ट्राफीक जाम व्हायला लागले आहे. एकंदरीत या सगळ्या दृष्यांवरून असे दिसून येते की, राज्यात पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे.

आता गोव्यात वाढत्या पर्यटनाबरोबर गुन्हेगारीतही वाढ होतांना दिसत आहे. त्यासोबतच अंमली पदार्थाच्या तस्करीही वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी गोवा पोलीस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या वाढणार. दरम्यान काही दिवसांपुर्वी मुंबईहून गोव्यात आलेल्या आठजणांची अमली पदार्थ तस्करांची टोळी पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतली. संशयितांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.

गोव्यातील वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमिवर गोवा पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. "आम्ही सर्व पर्यटन स्थळांवर गस्त वाढवली आहे. पर्यटकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी टुरिस्ट पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमली पदार्थांचा व्यापार होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलत आहोत" अशी माहिती उत्तर गोवाचे एसपी शोभित डी सक्सेना यांना आज सकाळी दिली.

Shobhit D Saxena, SP North Goa
पोरक्या विनीताला बालदिनी मिळाला पालकत्वाचा आधार..!

राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस खाते काम करत आहे. पोलिस तपासकामाची गोव्याची टक्केवारी देशात सर्वाधिक आहे. आता महिलांना सुरक्षितता देण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलीस खात्यात ‘पिंक फिमेल फोर्स’हे सक्षम महिला पोलीस दल उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Shobhit D Saxena, SP North Goa
Goa Rain Updates: राज्यात पावसाचा ‘अलर्ट’ पुढील 3 दिवस कायम

सर्वसामान्यांना पोलिसांची भिती वाटते किंवा ते आपली तक्रार नोदवितांना कचरतात. तेव्हा लोकांशी मित्रत्वाचे नाते जोपासा असेही सावंत यांनी सांगितले. पोलिस खात्याने परिस्थितीनुसार गुन्हेगारीसंदर्भातील विविध सूचना सरकारकडे पाठवल्यास त्यावर योग्य विचार करून तोडगा काढला जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम महिला पोलिस दलाची गरज आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची हल्लीच बैठक घेतली. त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. या महिला पोलिस समाजात लोकांबरोबर मित्रत्वाचे नाते जोपासण्याबरोबरच गुन्हेगारी तपासातही अधिक सक्षम होतील. असे गोवा पोलिस विभागाच्या एका कार्यक्रमात सावंत बोलत होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com