
Goa Traffic Fines: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या अडिच महिन्यांत गोवा पोलिसांनी तब्बल पाच कोटी दंड वसूल केला आहे. वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच जानेवारी 2023 ते आत्तापर्यंत केलेल्या कारवाईतून हा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट परिधान न करणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे या सारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही दंड ठोठावण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या उत्तर गोव्यात वाहतूक उल्लंघनाची तब्बल 42 हजार प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यातून वाहतूक पोलिसांनी सुमारे दोन कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर, उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून पोलिसांनी 5.10 कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे.
तसेच, म्हापसा उपविभागाने वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी चालकांकडून फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत 16 लाख रुपये दंड वसूल केला. तर छायाचित्रण उपक्रमाद्वारे वाहतूक उल्लंघनासाठी 300 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात असताना राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन देखील वाढले आहे.
दरम्यान, वाहतूक विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे अशी सूचना करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.