गोव्यात वाहतूक नियम शोभेचे!

पोलिसांकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष; कारवाईची गरज
Goa Traffic Rule
Goa Traffic RuleDainik Gomantak

पणजी : राज्यात वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने नियमांचे वाहतूक उल्लंघनही होत आहे. कायद्यात नव्याने दुरुस्ती करण्यात आली असली, तरी त्याची अंमलबजावणी रात्रीच्यावेळी काटेकोरपणे होत नाही. वाहतूक पोलिसांकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व कमी उपकरणे असल्याने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होते. वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई होत नाही, त्यामुळे हे नियम शोभेचे बनले आहेत.

हल्लीच अटल सेतू व झुआरी पुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतूक पोलिस यंत्रणा हे अपघात रोखण्यासाठी कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. पुलावर वेगमर्यादा असूनही त्याचे पालन होत नाहीच व त्याचे उल्लंघन होत असूनही पोलिस यंत्रणाही दिवस-रात्री तैनात केली जात नाही. रात्रीच्यावेळी मद्य प्राशन करून वाहन चालवण्यास बंदी आहे. मात्र त्याचे पालन ९० टक्के लोकांकडून होत नाही. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक खाते तसेच वाहतूक पोलिस विभागाकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यासाठी उपाययोजनाही आखण्यात आलेल्या नाहीत.

Goa Traffic Rule
गोव्यातील 39 गावे अद्यापही 4-जी नेटवर्क सेवेपासून वंचित!

वाहतूक खाते व पोलिस खात्याकडे इंटरसेप्टर वाहनांची कमतरता आहे. त्यांच्याकडे असलेल्या स्पीड रडारची संख्याही कमी असल्याने अधूनमधून विविध पुलावर स्पीड रडार घेऊन पोलिसांना वाहनांची वेगमर्यादा मोजली जाते. मात्र कायमस्वरूपी या पुलावर स्पीड रडार खांब्यावर लावण्यात आल्याने त्याचा फायदा घेऊन वाहन चालक भरधाव वेगाने वाहने हाकत आहेत. मात्र त्यामुळे मोठ्या दुर्घटना रोखण्यास सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवी वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत नाही.

पोलिसही कारवाई गंभीरपणे करत नाहीत व वाहन चालकही नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक रक्कम जमा करून निघून जातात.

पोलिसांनी ठरवले तर नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम उघडून कारवाई करू शकतात, मात्र त्यानंतर कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलिसही कारवाई करताना घाबरतात. काही वाहन चालक पोलिसांनाच राजकारण्यांची नावे घेऊन दम भरतात. अशावेळी पोलिसांची कुचंबणा होते. त्यामुळे कोणाशी वाद घालण्यापेक्षा जे सुरळीत चालले आहे, ते ठीक आहे, असा विचार करून वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहे.

दहा हजारांचा दंड

नव्या दुरुस्ती कायद्यानुसार मद्य घेऊन वाहन चालवणाऱ्यांना सुमारे दहा हजार रुपयांचा दंड आहे मात्र पोलिस त्याची अंमलबजावणी करत नाहीत. कुठे तरी चालक व पोलिसांत समझोता होऊन प्रकरण मिटवले जाते. त्यामुळे कारवाईपासून सूट मिळू शकते, असा चुकीचा संदेश वाहन चालकांमध्ये जात आहे. हल्लीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदाच्या खालील पोलिसाला वाहन चालकाला नियमांचे उल्लंघन केल्यास दंड देण्याचा असलेला अधिकार काढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com