Goa: वाळपईत घरावर कोसळले झाड

Goa: वाळपईत घरावर कोसळले झाड
walpai.jpg

वाळपई: सत्तरी तालुक्यात (Satari) सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. वाळपईत (Walpai) आग्नेलो फर्नांडिस (Agnelo Fernandes) यांच्या घरावर झाड कोसळून लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली आहे. 

वाळपईचे तलाठी तुळशीदास मांद्रेकर (Tulshidas Mandrekar) यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच स्थानिक नगरसेवक विनोद हळदणकर (Vinod Haldankar) यांनी फर्नांडिस यांच्या घरी जाऊन घटनेचा आढावा घेतला. या दुर्घटनेने आग्नेलो यांना बराच आर्थिक फटका बसला आहे. (Goa A tree fell on a house in Walpai)

आपत्कालीन नियंत्रण कक्ष 
दरम्यान, वाळपई मामलेदार कार्यालयात चोवीस तास आपत्कालीन नियंत्रण केंद्र कक्ष सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात हे कक्ष नागरिकांच्या सेवेत असणार आहे. लोकांनी आवश्यकवेळी  08322374090 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com