सडा लक्ष्मीनारायण प्रांगणात तुळशीविवाह उत्साहात

तुळशीविवाह संपन्न झाला. महिला मंडळी व इतर उपस्थित भजनप्रेमीनी आरती सादरीकरण केल्यानंतर तिर्थप्रसादाने भजनी कार्यक्रम व तुळशीविवाह कार्यक्रम झाला.
सडा लक्ष्मीनारायण प्रांगणात तुळशीविवाह उत्साहात
लक्ष्मीनारायण प्रांगणातील तुळशीविवाह प्रसंगी नगरविकास मंत्री श्री मिलिंद सगुण नाईक, अध्यक्ष प्रेमानंद केरकर व इतर.Dainik Gomantak

दाबोळी: हेडलॅन्ड सडा मुरगांव गोवा येथील श्री इस्वटीब्राम्हण लक्ष्मी नारायण मंदिराच्या(temple) प्रांगणात काल रात्री तुळशीविवाह उत्साहात साजरा करण्यात आला. मुरगांवचे आमदार (MLA) व गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद सगुण नाईक हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

एकनाथ गजानन मोरुडकर, संतोष गजानन मोरुडकर, तसेच अमेय पटवर्धन भटजी, प्रसन्ना आपटे भटजी, अक्षय पटवर्धन भटजी, श्रीयुत रेडकर व वरिष्ठ मंगलाष्टके गायक बाबू नाईक यांनी प्रत्येकी दोन दोन मंगलाष्टके म्हटली.

लक्ष्मीनारायण प्रांगणातील तुळशीविवाह प्रसंगी नगरविकास मंत्री श्री मिलिंद सगुण नाईक, अध्यक्ष प्रेमानंद केरकर व इतर.
वर्षभरात पुर्ण होणार दाबोळी विमानतळाचे काम ; गगन मलिक

त्या अगोदर सड्यावरील महिला मंडळीचे भजन सादर झाले होते, भैरवी सादर झाल्यावर तुळशीविवाह संपन्न झाला व तदनंतर त्याच महिला मंडळी व इतर उपस्थित भजनप्रेमीनी आरती सादरीकरण केल्यानंतर तिर्थप्रसादाने भजनी कार्यक्रम व तुळशीविवाह कार्यक्रमाची सांगता झाली.

मंदिर समिती अध्यक्ष प्रेमानंद केरकर यानी सर्व उपस्थित महिला भजनी कलाकारांचे (artists) व मंगलाष्टके गायकांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com