सांगेतील वकिलावर प्राणघातक हल्ला

Two men attack lawyer in car
Two men attack lawyer in car

सांगे:  सांगे येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व ॲड. अमर नाईक यांच्यावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कुयणमळ येथील निर्जनस्थळी चालत्या वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी नाईक यांच्या चारचाकी वाहनाच्या दर्शनी भागावर मोठा दगड फेकला व दुचाकी थांबवून वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा लॉक असल्यामुळे त्यांना तो उघडता आला नाही. नाईक यांनी कॉल करण्यासाठी मोबाईल उचलताच घटनास्थळावरून हल्लेखोर पळाले.

या प्रकरणी नाईक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला आहे. सांगे पत्रकार संघानेही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. 

ॲड. अमर नाईक म्हणाले, आपण आपल्या कार्यालयातून तारीपांटो मार्गे घरी परतत असताना कुयणमळ येथे निर्जन स्थळी समोरून येणाऱ्या दुचाकीवर दोन तरुण होते त्यापैकी मागे बसलेल्या हल्लेखोराने आपल्या गाडीवर दगड मारला. सुदैवाने काच फुटली पण आपल्याला जखम झाली नाही. ही घटना घडताच आपण गाडी उभी केली असता हल्लेखोर सांगेच्या दिशेने पळाले. या घटनेची आपण सांगे पोलिस स्थानकात नोंद केली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून किंवा नियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा संशय नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आपल्यावर पाळत ठेऊन हा हल्ला करण्यात आला आहे. आपण किती वाजता कार्यालयातून बाहेर पडलो, कुठल्या वाहनातून येत आहे, कुठल्या मार्गाने जात आहे याची सविस्तर माहिती मोबाईलद्वारे हल्लेखोरांना दिली असावी, असा संशय अमर नाईक यांनी व्यक्त केला. सांगे पोलिसांनी यावेळेतील मोबाईल संभाषण तपासणी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
 
मागील आठवड्यात बेकायदा रेती उपसा आणि चिरे उत्खनन प्रकरणी आपण आवाज उठवला होता. सरकारने हा व्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी आपण केली होती. तसेच महिना, दोन महिन्यांपूर्वी आपल्यावर काठीने एका कुटुंबाने हल्ला केला होता. पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करून गुन्हेगारांना पकडतील, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. सांगे पोलिस व प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून अमर नाईक यांना न्याय देण्याची मागणी सांगे पत्रकार संघाने केली आहे. 

भ्याड हल्ले खपवून घेणार नाही ः आमदार गावकर
आमदार प्रसाद गावकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, पत्रकार चांगल्या बरोबर वाईट घटना उजेडात आणतात. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्यांच्यावरील भ्याड हल्ले खपवून घेणार नाही. ही अत्यंत वाईट घटना असून पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करणे आवश्‍यक आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com