गोवा: अन्वर शेख हल्ला प्रकरणात दोन संशयीतांना सहा दिवसांची पोलिस कोठडी   

Goa Two suspects in Anwar Sheikh attack case remanded in police custody for six days
Goa Two suspects in Anwar Sheikh attack case remanded in police custody for six days

सासष्टी: आर्ले सर्कल परिसरात अट्टल गुन्हेगार अन्वर शेख याच्यावर  प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांपुढे गुरुवारी शरणागती पत्करलेले व्हॅली डिकाॅस्ता आणि अमीर गवंडी या संशयीतांना आज रिमांडसाठी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हे हल्ला प्रकरण 16 फेब्रुवारी रोजी घडले होते. तेव्हापासून फरार असलेले व्हॅली व अमीर यांच्याविरोधात फातोर्डा पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. 

दीड महिन्यानंतर या दोघांही संशयितांनी फातोर्डा पोलीस ठाण्यात येऊन शरणागती पत्करली. या हल्ला प्रकरणी पोलिसांनी रिकी होर्णेकर (कुडचडे), विपुल पट्टारी (खारेबांद), हर्षवर्धन सावळ (37, म्हापसा), विजय कारबोटकर (31,पर्वरी) , इम्रान बेपारी (३२, सांताक्रूझ), सुदन डिकॉस्ता (40, सुरावली) महिंदर उर्फ मयूर तानावडे (37, पर्वरी) या संशयीतांना आधीच अटक केली होती. यातील मयूर तानावडे याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com