Goa: उ.मा. विद्यालयातील 11 वी 12 वीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या सत्रातील परिक्षा आॅफलाईन (Offline Exam) घेतल्यास चालतील. शिक्षक (Teachers) संघटनेची भुमिका.
Goa: उ.मा. विद्यालयातील 11 वी 12 वीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने
Offline ExamDainik Gomantak

पणजी: उ.मा. विद्यालयातील 11 वी 12 वीच्या परिक्षा (Exam) घेण्याची मागणी पालकांसह प्राचार्य मंचने केल्यानंतर सरकारने परिपत्रक काढून 11 वी 12 वीच्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षा आॅफलाईन घेण्याचे जाहिर केले. मात्र उ.मा. शिक्षक संघटनेने सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उ.मा. विद्यालयाच्या प्राचार्य व शिक्षकांत संघर्ष निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीच्या (Covid 19) संकटामुळे गेले दिड वर्ष राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद होती. कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यानंतर सरकारने महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाचे वर्ग तसेच राज्यातील IT चे वर्ग गेल्या महिनाभरापासून सुरु केले आहेत. त्यानंतर गोवा सरकारने राज्यातील 9 वी च्या पुढील वर्ग दिवाळापुर्वी सुरु करण्याचे जाहिर केले होते. दोन दिवसापुर्वी परिपत्रक काढून 11वी व 12 वी च्या परिक्षा आॅफलाईन घ्याव्यात, मात्र त्यासाठी सक्ती न करता आॅनलाईन व आॅफलाईन असे पर्याय ठेवले आहेत.

या परिपत्रकाला उ.मा. शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या परिपत्रकावरुन प्राचार्य मंच व शिक्षक संघटना यांच्यात बराच वाद होण्याची शक्यता आहे.

Offline Exam
Goa: असंघटीत कामगारांना मोठा दिलासा

डिसेंबरच्या परिक्षा आॅफलाईन घ्याव्यात:

सध्या 11 वी 12 वीच्या दुसऱ्या सत्रातील परिक्षा सुरु आहेत. काही उ.मा. विद्यालयाच्या पुर्ण होत झाल्या आहेत. परिक्षा सुरु असताना अचानक त्या आॅफलाईन (offline)घेण्याचे जाहिर करणे चुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थी वर्ष दिड वर्ष घरीच आहेत.

त्यांना काही दिवस उ.मा. विद्यालयात बोलावून त्यांची मानसीक तयारी करुन घेणे गरजेचे आहे. उ.मा. विद्यालयाचे सेनीटायझींग करणे, 50 टक्के विद्यार्थ्यासाठी (Student)जागा तयार करणे, आदी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्राचार्य मंचने मागणी करण्यापुर्वी या गोष्टींचा विचार करणे गरजेचे होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या सत्रातील परिक्षा आॅफलाईन घेतल्यास चालतील. अशी भुमिका उ.मा. विद्यालयाच्या शिक्षक संघटनेची आहे.

Related Stories

No stories found.