राज्यात विद्यपिठाचे प्रशासन ढासळले

गोवा विद्यपिठाचे प्रशासन ढासळले असून तिसऱ्या वर्षाच्या परिक्षांचा निकाल अद्याप जाहिर केला जात नाही.
राज्यात विद्यपिठाचे प्रशासन ढासळले
Goa University administration collapsed Dainik Gomantak

पणजी: गोवा (Goa) विद्यपिठाचे (University) प्रशासन ढासळले असून तिसऱ्या वर्षाच्या परिक्षांचा निकाल अद्याप जाहिर केला जात नाही. असा आरोप एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी आज केला. कॉंग्रेस पक्षाचा विद्यार्थी विभाग असलेल्या एनएसयुआयने या संघटनेने आज गोवा विद्यापिठाच्या कुलसचिवांची भेट घेतली व तिसऱ्या वर्षाच्या परिक्षांचा निकाल लवकर जाहिर करण्याची मागणी केली.

Goa University administration collapsed
भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन

एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी या भेटीनंतर दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाच्या परिक्षा होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप निकाल जाहिर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तसेच काहीना पुढील शिक्षणासाठी गुणपत्रिकेची गरज आहे. मात्र ८ आठवड्यात निकाल जाहिर करण्याचा नियम असताना अद्याप तो जाहिर झालेला नाही. तो लवकर जाहिर व्हावा यासाठी आज एनएसयुआयचे एक शिष्ठमंडळ गोवा विद्यापिठाच्या कुलसचिवाना भेटले त्यांनी येत्या आठवड्यात निकाल जाहिर करण्याचे आश्‍वासन दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. विद्यपिठाच्या ढीसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा दावा यावेळी चौधरी यांनी केला.

Related Stories

No stories found.