गोवा विद्यापीठ: पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

एक सप्टेंबरपासून पहिल्या सत्रास सुरवात होईल. त्यानंतर दिवाळीची सुटी १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर रोजी दिली जाईल. त्यानंतर ख्रिसमसची २५ ते २७ डिसेंबरला सुटी मिळेल. ही सुटी झाल्यानंतर लगेचच २८ फेब्रुवारीपासून ६ जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या सत्रातील पुरवणी परीक्षा (सत्र एक आणि सत्र तीन) होईल.

पणजी: गोवा विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक वर्षीचे २०२०-२१चे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी यांनी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार दिवाळीची दोन दिवस आणि खिसमसची तीन दिवस सुटी मिळणार आहे. दिवाळीसाठी जी मोठी सुटी विद्यार्थ्यांना यापूर्वी मिळत होती, ती आता मिळणार नाही. 

विद्यापीठाने यापूर्वीच अभ्यासक्रम शिकविण्यास ऑनलाईनपद्धतीने सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले आहे. एम.ए., एम.एस्सी, एम.कॉम, एमबीए, आयएमबीए, एम.सी.ए., आयएमएससी, बी.एल.आय.एस्सी, एम.एल.आय.एस्सी या विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या पदव्युत्तर अभ्याक्रमांचा त्यात समावेश आहे. एक सप्टेंबरपासून पहिल्या सत्रास सुरवात होईल. त्यानंतर दिवाळीची सुटी १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर रोजी दिली जाईल. त्यानंतर ख्रिसमसची २५ ते २७ डिसेंबरला सुटी मिळेल. ही सुटी झाल्यानंतर लगेचच २८ फेब्रुवारीपासून ६ जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या सत्रातील पुरवणी परीक्षा (सत्र एक आणि सत्र तीन) होईल.

दुसऱ्या सत्रास ७ जानेवारीपासून सुरुवात होऊन ते १७ मे २०२१ रोजी संपणार आहे. त्यात ३ मे ते १७ मे या दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा होईल. त्यानंतर २१ मे ते ६ जूनपर्यंत उन्हाळी सुटी राहणार आहे. दरम्यान, विद्यापीठाने पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्राची सुरुवात १ सप्टेंबरपासून होऊन ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर ४ ते २३ डिसेंबर या दरम्यान पहिल्या सत्राची परीक्षा होईल. तर दुसरे सत्र जानेवारी ते १३ मे पर्यंत चालेल. या सत्राच्या परीक्षा ३ मे ते १९ जूनपर्यंत घेण्यात येतील.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या