Goa University: पदवी,‌ पदव्युत्तर परीक्षा वेळापत्रकात बदल

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

सरकारला लोकांची काळजी नाही. गोव्यात प्राणवायुचा तुटवडा असताना तो सिंधुदुर्गला पुरविण्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेले आश्वासन आमचा दावा खरा ठरवत आहे. रुग्णांचे प्राणवायुअभावी हाल होत असताना मुख्यमंत्री सिंधुदुर्गला कुठला पुरवठा करणार हे त्यांनी स्पष्ट करावे.

पणजी: गोवा विद्यापीठाने(Goa University) पदवी(Graduate) व पदव्युत्तर परीक्षांसंदर्भात(Exam) यापूर्वी जे परिपत्रक जारी केले होते त्यात आता बदल केलेला असून कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. गोवा विद्यापीठाने फेररचित परीक्षा कार्यक्रमासंदर्भात 7 रोजी जे परिपत्रक जारी केले आहे त्यात 17 मेपासून सुरू होणार असलेल्या ऑनलाईन(Online Exam) परीक्षा आता मंगळवार 1 जूनपासून सुरू होतील, असे नमूद करण्यात आले आहे.(Goa University graduate and postgraduate examination schedule Change)

ऑफलाइन परीक्षा 16 जूनपूर्वी घेतल्या जाणार नाहीत आणि या परीक्षा सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी विद्यार्थ्यांना त्यासंबंधीची सूचना दिली जाईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गोवा विद्यापीठाने आपल्याकडील विविध विभाग प्रमुख आणि विविध महाविद्यालयांचे प्रमुख यांना हे बदल संबंधितांच्या नजरेस आणून देण्याचे आवाहन केले आहे.

Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे 

दरम्यान सीबीएसईचा दहावी निकाल कधी आणि कसा लागणार, याबाबतची माहिती केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. यासंदर्भात विस्तृत माहिती सीबीएसईच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अंतर्गत मुल्यमापनावर निकाल लागणार असून आता. मंडळाने परीक्षा रद्द केल्याने 80 गुणांचे मुल्यांकन शाळांनीच करायचे आहे. त्यासंदर्भात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने 1 मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. 

गोवा: सरणावर जाण्यास मृतदेहांना करावी लागतेय प्रतीक्षा 

राज्य सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यासंदर्भात परीक्षा रद्द की घेणार याबद्दल अदयाप स्पष्टता दिसत नाही. गोवा सरकार याच पद्धतीने निकाल जाहीर करणार की वेगळे काही सूत्र अवंलबणार आहे, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. राज्य सरकार कोणत्याही वाटेने गेली तरी आरोप-प्रत्यारोप होणारच. पण शासनाने विद्यार्थी-पालकांची सद्यस्थिती व नव्या शैक्षणिक पर्वारचे भान ठेवून नवे बदल प्राप्त परिस्थितीत स्वीकारून सुवर्णमध्य साधायला हवा, असे गोव्यातील पालक आणि शिक्षकांचेही मत आहे.

संबंधित बातम्या