गोवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल; आता असे असेल शैक्षणिक वर्ष

गोवा विद्यापीठाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात 20 टक्क्यांनी कमी केला आहे.
Goa University
Goa University Dainik Gomantak

Goa University Latest News | कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्येनंतर शैक्षणिक वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात, गोवा विद्यापीठाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 20 टक्क्यांनी कमी केला आहे.

अभ्यासक्रम कमी करण्यासोबतच शिक्षणाचे दिवसही कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नवे शैक्षणिक वर्ष हे येत्या 20 जुलैपासून सुरु होईल. (Goa University Latest News)

Goa University
अखेर आगोंदा-पाळोळे बीच येथील सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात

शिक्षणाचे दिवस कमी केल्यामुळे, परीक्षेसाठी निर्धारित अभ्यासक्रमाच्या फक्त 80% भागांचा समावेश केला जाईल, ज्याचा तपशील लवकरच गोवा विद्यापीठातर्फे कळविला जाईल. 20 जुलै 2022 पासून 2022-23चे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, अशी माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे. हे बीए, बीएस्सी (गृहविज्ञानासह), बीकॉम, बीए बीएड, बीसीए विद्यार्थी इत्यादींना पदवीपूर्व स्तरावर लागू होणार आहे.

तसेच पदव्युत्तर स्तरावर हे परिपत्रक एमए, एमएससी, एमकॉम, एमपीएच्या विद्यार्थ्यांना लागू होईल. 31 मे 2022 पर्यंत शिक्षणाचे दिवस 72 दिवसांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. 6 जून ते 5 जुलै या कालावधीत परीक्षा होणार असून विद्यार्थी 19 जुलैपर्यंत सुट्टीचा आनंद घेतील.

अंतिम वर्षासाठी पेपर सेटिंग/परीक्षेचे आयोजन संबंधित महाविद्यालयांनी करावे. पुरवणी परीक्षा 25 जुलै 2022 पासून सुरू होणार आहेत. FY/SY साठी निकाल जाहीर करण्याची सुचवलेली तारीख 10 जुलै 2022 आहे. त्याचप्रमाणे अंतिम वर्षाचे प्रकल्प 20 मे 2022 पर्यंत सादर करायचे असून आणि बाह्य परीक्षकांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, गोवा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने (UCTAG) म्हटले होते की शैक्षणिक वर्षात जास्त विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास खूप उशीर होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com