Goa University: पीएचडीसाठी ऑगस्टमध्ये प्रवेश परीक्षा

29 जुलैपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी; प्रवेश परीक्षा ऑगस्टमध्ये
Goa University
Goa University Dainik Gomantak

गोवा विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. गोवा विद्यापीठाने असे म्हटले आहे की, GU-PhD प्रवेश परीक्षेसाठी (GU-PET) अर्ज 29 जुलैपर्यंत ऑनलाइन स्वीकारले जातील. तसेच ही परिक्षा 17 आणि 18 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे.

(Goa University to hold entrance test for PhD courses on August 17, 18 )

37 विषयांच्या पीएचडीसाठी जुलैमध्ये प्रवेश परीक्षा

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये विद्यार्थ्यांसाठी 37 विषयांमध्ये पीएचडीसाठीची परिक्षा घेतली जाणार आहे. ज्याची प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. या 37 विषयांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, हिंदी, कोकणी, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, महिला अभ्यास, जैवतंत्रज्ञान, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, सागरी विज्ञान, पृथ्वी विज्ञान, या विषयांचा ही समावेश आहे.

Goa University
Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीचं 'ते' हॉटेल बेकायदेशीरच

पीएचडीसाठी आवश्यक पात्रता

गोवा विद्यापीठ आणि तिच्या मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांद्वारे ऑफर केलेल्या विविध पीएचडी प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी वैध GU-PET प्रमाणपत्र आवश्यक.

GU-PET साठी उपस्थित राहण्यास पात्र असे उमेदवारअसतील ज्यांनी एकूण किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या समतुल्य व्यावसायिक पदवी प्राप्त केली आहे.

Goa University
Kargil Vijay Diwas: ''भारतीय जवानांनी शत्रुवर नेहमीच विजय मिळवला''

GU पीएचडी अभ्यासक्रमांसाठी 17, 18 ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा घेणार आहे

"उमेदवारांना GU-PET साठी जास्तीत जास्त तीन विषयांमध्ये अर्ज करण्याची परवानगी आहे," असे विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे नियमित एमफिल, CSIR-UGC, UGC NET JRF, लेक्चरशिप, SET, SLET, JEST, ICAR-NET, GATE किंवा GPAT प्रमाणपत्र आहे त्यांना GU-PET साठी उपस्थित राहण्याची गरज नाही. असे ही विद्यापीठीने स्पष्ट केले आहे.

जे उमेदवार त्यांच्या अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत ते देखील GU-PET साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

"GU-PET मध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे," असे विद्यापीठाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com