Goa University: UG-PG च्या परीक्षा 16 जूनपर्यंत स्थगित

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

मागच्या 24 तासात गोव्यात 67 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona) वाढत्या कारणास्तव गोवा यूनिवर्सिटीने अंडरग्रेजुएट (UG) आणि पोस्ट ग्रेजुएट (PG) च्या ऑफलाइन मोडमध्ये होणा-या परीक्षेत 1 जून जूनपर्यंत स्थगित केलेल्या आहेत. आधिकारिक नोटिसमध्ये म्हटले आहे की परीक्षेच्या 15 दिवस अगोदर परिक्षा कधी होणार याची माहिती दिली जाईल. सर्वच महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षा 8 जून, 2021 पर्यंत थांबविण्यात आल्या आहेत. बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए फर्स्ट आणि सेकंड इयर या विद्यार्थांची 2021 सालची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. तथापि, फाइनल सेमेस्टरसाठी परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल.(Goa University: UG-PG exams postponed till June 16)

'आप'ने सुरु केलेल्या ऑक्सिमीटर सेवेला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शोध व्यवस्थापनाची प्रत जमा करण्याची अंतिम तारीख 1 जून, 2021 आहे. गोवा यूनिवर्सिटीने स्पष्ट केले की तोंडी परीक्षा ऑनलाइन मोडमध्ये घेतल्या जाव्या. माहितीनूसार गोवा युनिवर्सिटी परीक्षा युजीसीच्या दिशा निर्देशानुसार होईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट unigoa.ac.in वरती जाऊन विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळू शकते.  

गोव्यात तालुकावार कोविड उपचार केंद्रे

दरम्यान, गोव्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. सध्या गोव्यात 31,875 सक्रिय रुग्ण आहेत. मागच्या 24 तासात गोव्यात 67 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या म्हणून भरपूर वादंग निर्माण झाले होते. नंतर गोवा सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अभिनेता सोनू सूदनेही परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. 

   

संबंधित बातम्या