उतोर्डा, माजोर्डा येथे रेल्वेमार्गाचे काम सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

उतोर्डा आणि माजोर्डा परिसरात रेलमार्गाच्या  दुपदरीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली असून यासंबंधी जागा संपादित केली नसताना हे काम सुरू केल्यामुळे नागरिकांना आपल्याला भेटून जागा संपादित करून देण्याची मागणी केली होती.

सासष्टी: उतोर्डा आणि माजोर्डा गावातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे भूसंपादन न करता दुपदरीकरणाचे काम सुरू केले आहे. 

यासंबंधी दक्षिण पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे विभागाचे अधिकारी आणि नागरिकांना घेऊन काम सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी पाहणी करून जागा संपादित करून सीमांकन करण्यात येणार आहे, अशी माहिती नुवेचे आमदार व एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ़्रेंड (बाबाशान) डिसा यांनी आज म़डगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. 

उतोर्डा आणि माजोर्डा परिसरात रेलमार्गाच्या  दुपदरीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली असून यासंबंधी जागा संपादित केली नसताना हे काम सुरू केल्यामुळे नागरिकांना आपल्याला भेटून जागा संपादित करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज दक्षिण पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक एस.जी. बेनर्जी आणि अधिकारी सचिन कुमार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे, असे डिसा यांनी सांगितले. 

उतोर्डा आणि माजोर्डा वासीयांना भेडसावणाऱ्या या समस्येचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवारी दक्षिण पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करण्यात येणार असून या पाहणीत उतोर्डा आणि माजोर्डावासीय उपस्थित राहणार आहेत. 

या पाहणीत दुपदरीकरणासाठी येणारी जागा संपादित करून सीमांकान करण्यात येणार असून दुपदरीकरणाच्या कामासाठी लागणाऱ्या नवीन जागेचेही सीमांकान करण्यात येणार आहे, असे  डिसा यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या