Goa Vaccination: डिचोलीत 44 टक्के नागरिकांनी घेतली लस

Vaccination 1.jpg
Vaccination 1.jpg

डिचोली: डिचोली तालुक्यात आतापर्यंत जवळपास 44 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण 83 हजार 230 नागरिकांपैकी कालपर्यंत एकूण 36 हजार 490 मतदारांनी पहिला डोस घेतल्याची माहिती मिळाली आहे. (Goa Vaccination: 44% of citizens took the corona vaccine In Bicholim) 

‘टिका उत्सव-3’ला कालच्या तुलनेत आज समाधानकारक  प्रतिसाद मिळाला. आज चार  केंद्रात मिळून तब्बल 701जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आजपर्यंत सहा दिवसात मिळून तरुणाईसह तालुक्यात 4  हजार 366 जणांनी लस घेतली आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी केवळ 6 बळींची नोंद झाली. दोन महिन्यानंतर एका दिवसांतील हे सर्वात कमी बळी आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना (Covid-19) बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या ही 2975 एवढी आहे. तर आज 34 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com