Goa Vaccination: 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं 3 जूनपासून लसीकरण

Goa Vaccination: 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं 3 जूनपासून लसीकरण
Goa Vaccination

पणजी: राज्यातील(GOA) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 3 जूनपासून कोरोना प्रतिबंधक लस(Vaccination) देण्याचा सरकारचा(Government) प्रयत्न आहे. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Dr. Pramod Sawant) यांनी घटक राज्यदिनानिमित्त गोमंतकीयांना दिलेल्या संदेशात हे भाष्य केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यास निरोगी व्यक्ती सुरक्षित होते. त्यामुळे गोवा सरकारने कोरोना लसीकरणावर जास्त भर देण्याचे ठरवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 45 वर्षावरील नागरिकांचे सध्या लसीकरण सुरू असून टीका उत्सव अंतर्गत विविध पंचायतीमध्ये त्याचबरोबर राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सुरू आहे.(Goa Vaccination Vaccination of citizens between the ages of 18 to 44 from June 3)

गोव्यात गेल्या वर्षभर कोविडमुळे आपत्ती ओढवली आहे. कोविडमुळे अनेकांना फटका बसलेला आहे. या कोविडच्या संकटात सामाजिक अंतर, तोंडाला मास्क परिधान करणे हे जीवनातील अंग बनले आहे. देशात कोविड विरोधात संघर्ष सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रत्येकवेळी योगदान देत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहोरात्र परिश्रम घेत कोरोना नियंत्रण येण्यासाठी कार्य केले आहे. गोवा राज्याला देखील मोदीजींचे फार मोठे सहकार्य मिळत आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले.

सत्तरी तालुक्यात आज सर्व पंचायतीत व वाळपई नगरपालिकेत भाजपतर्फे सेवा ही संगठन कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी राणे बोलत होते. केंद्रात मोदींजींच्या नेतृत्त्‍वाखाली भाजप सरकार येऊन सात वर्षे झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम सर्वत्र घेण्यात आले. यावेळी सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षिततेबाबत साहित्य सर्वत्र वितरीत करण्यात आले. यावेळी वाळपई नगर पालिका, म्हाऊस, नगरगाव, ठाणे डोंगुर्ली, सावर्डे, आदी ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येकाने कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन राणेंनी केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com