Goa Vaccination: गोयेंकरांना लसीची होम डिलीवरी मिळणार

Goa Vaccination: गोयेंकरांना लसीची होम डिलीवरी मिळणार
Goa Vaccination

पणजी: औषध खरेदी समितीच्या मान्यतेनंतरच दिलेल्या दरानुसार विविध प्रकारची औषधे खरेदी केली जाते. आयव्हर्मेक्टिन किंवा इतर कुठल्याही औषधाच्या खरेदीमध्ये कुठलाही घोटाळा(ivermectin scam) झालेला नाही, असा खुलासा आरोग्यमंत्री विश्वजित राणे(VISHWAJIT RANE) यांनी गुरुवारी केला. पर्वरी येथे पत्रकारांसोबत ते बोलत होते. राणे म्हणाले, की आरोग्य खाते कुठल्याही औषधांची खरेदी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी करते. स्वतःच्या फायद्यासाठी नाही. एखाद्या रुग्णाला तातडीने एखादे औषध हवे असल्यास त्याचा दर न पहाता ते त्वरित उपलब्ध करावे लागते.(Goa Vaccination Goa Health Department will facilitate the citizens to go home and get vaccinated)

घरी लस देणार!
राज्यात कोरोना लसीकरण(Vaccination) मोठ्या प्रमाणात सुरू असून  18  वर्षांवरील सर्व नागरिकांना सध्या राज्यभर विविध लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात येत आहे. जे नागरिक घरातून बाहेर पडू शकत नाहीत, अंथरुणावर आहेत  त्यांना घरी जाऊन लस  देण्याचा प्रयत्न आरोग्य खाते करणार आहे. येत्या आठवड्यामध्ये लसीकरणाला किती लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि त्यानंतर किती लोक मागे राहतात याचा अभ्यास करून घरी जाऊन लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी आज सांगितले.

खासगी इस्पितळांनी कचऱ्याची  विल्हेवाट लावावी 
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेला जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पांमध्ये फक्त सरकारीच नव्हे तर खासगी  इस्पितळांचा जैववैद्यकीय कचरा येतो. त्यामुळे विल्हेवाट लावण्याची जी क्षमता आहे ती पुरत नाही. कचरा साठवून ठेवावा लागतो. त्यामुळे राज्यातील खाजगी इस्पितळांनी स्वतःचा जैववैद्यकीय कचरा स्वतःच्या इस्पितळाच्या आवारातच प्रकल्प उभारून विल्हेवाट लावावी, असे राणे यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com