Goa Vaccination: लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ

डुप्लिकेट कोविशिल्ड लस गोव्यात सरकारी इस्पितळात मिळणे शक्य नाही
Goa Vaccination: लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ
Goa VaccinationDainik Gomantak

पणजी: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या चार दिवसांत 10,374 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 23,698 व्यक्तीनी दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात आतापर्यंत 15 लाख 94 हजार 326 इतके लसीकरण झाले आहे. यात 11,53,903 व्यक्तींनी पहिला डोस तर 4,40,423 व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak
Goa Vaccination
Goa Covid-19 Update: पाच बळींमुळे वाढली चिंता; सभांमध्ये नियमांचे तीनतेरा

दोन डोसमधील अंतर तीन महिने केल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मध्यंतरी फारच कमी होती. मात्र आता पहिला डोस घेऊन तीन महिने झालेल्यांनी दुसरा डोस घेण्यास प्राध्यान्य दिले आहे. त्यामुळे पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.राज्यातील सरकारी इस्पितळात जी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येते ती कोविशिल्ड ही लस केंद्र सरकार पुरवते. आत्तापर्यंत केंद्राकडून 22,94,326 डोस उपलब्ध केले आहेत. त्यामुळे डुप्लिकेट कोविशिल्ड लस गोव्यात निदान सरकारी इस्पितळात तरी शक्यता नाही, असे लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

Goa Vaccination
Goa Curfew: बाप्पांवरही कोरोनाचं सावट, कर्फ्यूत 13 सप्टेंबरपर्यंत वाढ

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com