Goa: एकच दिवसात 10,942 लसीकरण

आरोग्य खात्याच्या माहितीप्रमाणे आज 4,658 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
Goa: एकच दिवसात 10,942 लसीकरण
Corona Dainik Gomantak

पणजी: राज्यात कोरोना (Covid 19 ) नियंत्रणात येत असला तरी गोवा सरकारने (Goa Government) कोरोना नियंत्रणासाठीच्या कामात कुठेच ढालाई बाळगलेली नाही. राज्यातील प्रमुख इस्पितळात कोरोना बाधितावर उपचार सुरु असून विविध आरोग्य केद्रात नव्या कोरोना चाचण्या सह लसीकरण जोरात सुरु आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एका कोरोना रुग्णाचे निधन झाले.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 4,658 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. अहवालानुसार आज 60 नवे कोरोना बाधीत सापडले तर 74 कोरोना बाधीत बरे झाले. आजच्या एका कोरोना बाधिताच्या मृत्यूमुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मत्यू होणाऱ्यांची संख्या 3,326 झाली आहे.

Corona
नवरात्रीचे अवचित्य साधून महिलांसाठी कोरोना लसीकरण; आदिती तटकरे

दरम्यान आज 9 आॅक्टोंबर रोजी राज्यात 733 सक्रिय रुग्ण असून आज दिवसभरात 10,942 इतके लसीकरण झाले.

Related Stories

No stories found.